प्रेक्षकांना भावतोय साऊथचा तडका

पप्पी दे पारूलाच्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं अण्णाने लावला चुन्नाया मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले.

सुमित म्युझिक प्रस्तुत ‘अन्नाने लावला चुन्ना’ या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे. मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे. या गाण्यातून मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वांना नाचायला लावणारं आणि मराठीला मस्त असा साऊथचा तडका दिलेलं हे गाणं हा एक नवा प्रयोग होता. कोणतंही गाणं हे जेव्हा हिट होतं तेव्हा त्यामागे गायक आणि संगीतकार यांच्या सोबतच गीतकाराचा खूप मोठा सहभाग असतो. कारण जेव्हा गाण्याचे शब्द प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतात आणि त्यांना भावतात तेव्हाच ते गाणं हिट होतं. गीतकार संगीतकार व गायिका यांची मेहनत आणि कलाकारांचा अभिनय पाहताअण्णाने लावला चुन्ना’ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल असा विश्वास होता आणि हा प्रेक्षकांनी सार्थ ठरवला. गेल्या दोन दिवसात दहा हजारांहून अधिक लोकांनी युट्युबवर हे गाणे पाहिलं आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहता येत्या काळात हे गाणे अजूनच लोकप्रिय होईल यात शंका नाही.

अण्णाने लावला चुन्ना’ गाण्याची लिंक :