बबन नक्की बघाच

मराठी चित्रपटांचा दर्जा वाढत असतानाच मराठीत अनेक अर्थपूर्ण आणि आशय पूर्ण चित्रपट येत आहे. शहरातील गाजावाजा, लखलखाट आणि भव्यदिव्य सेट अशा चित्रपटांपेक्षा हल्ली वास्तवदर्शी चित्रपटांना प्रेक्षक जास्त पसंत करतात. गोष्ट छोटी डोंगराएवढी, फॅन्ड्री, सैराट, गाभ्रीचा पाऊस अशा अनेक चित्रपटांतून अत्यंक भयानक आणि जळजळीत असं वास्तव प्रेक्षकांसमोर आणून मांडलं. अशाच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ख्वाडा.

ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एक नवी कथा घेऊन येत आहेत. भाऊराव कऱ्हाडे यांचा नवीन चित्रपट बबन अलीकडेच म्हणजे दिनांक २३ मार्च ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रत्येक चाहत्याने बघावाच असा आहे. बसल्या बसल्या हा तुम्हाला अत्यंत वेगळ्या दुनियेत घेऊन जातो आणि तिथे खिळवून ठेवतो. त्या कथानकातून तुम्ही चित्रपट संपेपर्यंत बाहेरच पडत नाही.

ही कथा एका होतकरू तरुणाची आहे. त्याला आयुष्यात खूप मोठ व्हायचं आहे. अगदी लहान असल्यापासूनच तो अभ्यास आणि काम या दोन्हीवर तारेवरची कसरत करत असतो. कॉलेज मध्ये गेल्यावर तो कोमल या मुलीच्या प्रेमात पडतो. त्याच्या वाटेत त्याचा स्तू अभय येतो आंनी राजकीय आणि सामाजिक पडद्यावर हे कथानक रंगत जातं.

भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन आणि  कथानकाबरोबरच भाऊराव शिंदे यांचा अत्यंत सहज आणी नैसर्गिक वाटणारा अभिनय त्या कथानकामध्ये जीव ओततो. प्रेक्षकांना असं वाटतच नाही कि ते एक चित्रपट बघत आहेत आणि खराखुरा प्रसंग नाही. भाऊराव शिंदे यांच्या अभिनयाला शीतल चव्हाण, अभय चव्हाण, गायत्री जाधव, योगेश दिम्बले हे कलाकार उत्तम साथ देतात. याचबरोबर या चित्रपटात वापरलेली गावरान बोलीभाषा प्रेक्षकांना तिकडच्या वातावरणात घेऊन जाते. कुठलीही भारीभक्कम डायलॉगबाजी न करता उत्स्फूर्तपाने येणारे संवाद हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. याच्या जोडीलाच या कथानकात अनेक सामाजिक समस्या दाखविल्या गेल्या आहेत ज्या प्रचंड परिणामकारकपणे प्रेक्षांच्या काळजाला घरपाडतात. या सगळ्याला उत्तम साथ लाभली आहे ती म्हणजे संगीताची. हर्षित अभिराज ने या चित्रपटाला संगीत दिलं आहे. सोपं पण डोक्यात बसेल असं संगीत या चित्रपटात वापरलं आहे आणि त्यामुळे याचा परिणाम दूरगामी होतो. साज ह्यो तुझा या गाण्याने आधीच धुमाकूळ घातला आहे. बाहेर पडतानाही तुमच्या ओठावर हे गाणे असतात.

जीवनाचा रोजचा संघर्ष चितारणारी हि कथा बघायला तुम्हाला जायलाच हवं.