बबन साठीची मेहनत

शून्यातून स्वर्ग उभारण्याचं स्वप्न अनेक जण बाळगतात.  अशाच प्रकारे आपल्या लहानशा उद्योगातून मोठा उद्योजक व्हायचे स्वप्न पाहणारा तरुण आपल्याला बबन या चित्रपटात दिसतो.बबन चित्रपटातील हा तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ख्वाडा या चित्रपटातून आपली मोहोर उमटवणारा कलाकार भाऊसाहेब शिंदे आहे.  बबन हा भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट आहे. बबन चित्रपटामधल्या नायकासाठी भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी पुन्हा एकदा भाऊसाहेब शिंदे यांचीच निवड केली. व भाऊसाहेब शिंदे यांनीही या चित्रपटातील भूमिकेवर  काम करायला सुरुवात केली. ख्वाडा मध्ये नायकाची भूमिका करण्यासाठी साजेसा नायक मिळत नव्हता व म्हणून शेवटी ते काम भाऊसाहेब शिंदे यांना देण्यात आले. परंतु भाऊसाहेब शिंदेंनी त्यांना देण्यात आलेल्या या पहिल्या वाहिल्या संधीचे आपल्या  मेहनतीच्या जोरावर सोने केले. भाऊसाहेब शिंदेंची  मेहनत, कला, काम करण्याची पद्धत यामुळे ते नेहमीच भाऊसाहेब कऱ्हाडे यांची पाहिली पसंती राहिले व भाऊसाहेब कऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिंदे बबन या चित्रपटासाठी पुन्हा एकदा एकत्र आले.

भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी भाऊसाहेब शिंदे यांना ख्वाडा साठी वजन वाढवायला सांगितले होते व आता त्यांनी बबन चित्रपटातील भाऊसाहेब शिंदे यांच्या भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करण्यास सांगितले.

.भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की जेव्हा त्यांना कळवण्यात आले होते की बबन या चित्रपटासाठी नायक म्हणून त्यांची निवड झाली आहे तेव्हा त्यांचे वजन ८०किलो होते. तेव्हा त्यांना वजन घटवण्यासाठी सांगण्यात आले.चित्रपटाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी ७-८ महिने वेळ असल्याने त्या वेळात भाऊसाहेब शिंदे यांनी मेहेनत घेऊन वजन घटवण्यावर भर दिला.

ख्वाडा या चित्रपटातील तरुण हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा होता परंतु त्या तरुणाच्या तुलनेत बबन मधील तरुण वेगळा होता. सेट वर नायिकेबरोबर काम करताना भाऊसाहेब शिंदे फार लाजयचे अशी माहिती त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतीतून मिळते. परंतु तरीही त्यांनी आपल्या सगळ्या त्रुटींवर मात केली व भाऊसाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित बबन या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीच्या या विशाल आखाड्यात पुन्हा एकदा आपल्या अभिनयासह एन्ट्री घेतली. या चित्रपटात शीतल चव्हाण, अभय चव्हाण, गायत्री जाधव, योगेश दिम्बले हे इतर कलाकारही दिसतात. हर्षित अभिराज च्या धमाकेदार संगीताने आधीच प्रेक्षकांवर गारुड घातलं आहे. ह्या होतकरू तरुणाची ही कथा प्रेक्षकांच्या हृदयांना जिंकून घेते.