माधुरी दिक्षित ची बकेट लिस्ट

हिंदी सिनेमातील अनेक अभिनेते प्रादेशिक भाषांमध्ये काम करू लागले आहेत. प्रादेशिक चित्रपटांचा चढता दर्जा आणि विविध विषय नैसर्गिकपणे हाताळण्याची त्यांची पद्धत यामुळेच हे चित्रपट अत्यंत परिणामकारक होतात. गेल्याच वर्षी रितेश देशमुख ने लयभारी या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं. आता एक हिंदी सिनेमातील एक ख्यातनाम अभिनेत्री मराठीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे.

माधुरी दीक्षित, हिंदी सिनेमातील धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. राम लखन, दिल, परिंदा, खलनायक, हम आपके है कौन, राजा, दिल तो पागल है, देवदास अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून ही अभिनेत्री सुपरस्टार ठरली. केवळ अभिनय कौशल्य नव्हे तर आपल्या नृत्य कौशल्याने या अभिनेत्रीने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर आपली छाप पाडली. माधुरीजींच्या नृत्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे आणि साहजिकच त्यांनी सीनेसृष्टीतून विश्रांती घेतल्यावर अनेक चाहते उदास झाले होते. गुलाब गँग मधून त्यांनी पुनरागमन केल्यावर खुश झालेल्या चाहत्यांसाठी माधुरीजी अजून एक खुशखबरी घेऊन आल्या आहेत. माधुरीजी लवकरच एका मराठी सिनेमातून चंदेरी पडद्य्वर दिसतील. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे आणि या पदार्पणाबद्दल त्यांना आणि चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. माधुरी दीक्षित यांचा पहिला मराठी सिनेमा बकेट लिस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटांचे दिग्दर्शन तेजस देवोस्कर याने केले आहे. हा चित्रपट २५ मे ला आपल्या पडद्यावर झळकेल.

या चित्रपटात माधुरी बरोबरच रेणुका शहाणे, सुमीत राघवन, शुभा खोटे अशी दिग्गज मंडळी अत्यंत वेगवगळ्या भूमिकांमध्ये दिसतील. सध्या चित्रपटाची तयारी संपत आली असून चित्रपटाच्या प्रसारणासाठी सगळे व्यस्त आहेत. इतकेच नव्हे तर हा चित्रपट धर्मा प्रोडक्शन यांनी निर्माण केला असून खुद्द करण जोहर या चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे. कारण जोहर आणि एए फिल्मस् हा चित्रपट आपल्यासमोर घेऊन येणार आहेत.

चित्रपटाच्या टीझर ने अत्यंत प्रभावित झाल्याने करण जोहर ने हा चित्रपट वितरित करण्याचा आणि त्याची प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेतला. करण जोहरने सलग तिसऱ्यांदा प्रादेशिक सिनेमा मधील त्याची आवड दर्शविली आहे. या आधी त्याने राजामाउली यांच्या बाहुबली १ (बिगिनिंग) आणि बाहुबली २ (कनक्लूजन) या दोन्ही चित्रपटांची प्रसिद्धी केली होती. या चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला कि प्रादेशिक भाषेतील या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या माधुरीचा त्याला अत्यंत अभिमान आहे आणि म्हणून त्याने हा चित्रपट वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.