हिंदी सिनेसृष्टीत वाजणार अजय-अतुलच्या संगीताचा डंका !

हिंदी सिनेसृष्टीत वाजणार अजय-अतुलच्या संगीताचा डंका !

आतापर्यंत ४० हून अधिक चित्रपटांमधील गाण्यांना संगीत दिलेले अजय-अतुल आता सज्ज झालेले आहेत हिंदीतील मोठ्या निर्मितीसंस्थांच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी. ते चित्रपट आहेत खालीलप्रमाणे

  • धडक

सैराटचा हिंदी रिमेक असलेला धर्मा प्रोडक्शनचा ‘धडक’ हा चित्रपट अजय-अतुल यांच्या संगीतयादीत सामावायला आतुर झालेला आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या चित्रपटात ‘आर्ची’ आणि ‘परशाच्या’ म्हणजेच ‘परी’ आणि ‘मधुरच्या’ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. हा चित्रपट २० जुलै २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.

  •  ठ्ग्स ऑफ हिंदोस्तान

अजय-अतुल संगीतबद्ध करणार आहेत  यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटाला, म्हणजेच अमिताभ बच्चन, आमीर खान आणि कतरीना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ठ्ग्स ऑफ हिंदोस्तांला. या चित्रपटाचं बजेट आहे अंदाजे २१० कोटी रुपये. हा चित्रपट ७  नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.

  • झिरो

किंग खानची अतरंगी भूमिका असलेला ‘झिरो’ या चित्रपटाचं संगीत हि अजय-अतुलच करणार आहेत. कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा हि यात प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.

 

  • सुपर ३०

हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यात आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे ह्रितिक रोशन. आता ह्रितिकसारख्या डान्सरचे पाय अजय-अतुल कसे थिरकवतायत हे पाहण्यासारखं आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

  • ‘पानिपत…दि ग्रेट बिट्रेयल’

पानिपत… मराठ्यांच्या मनातली भळभळती जखम. ज्यावर इतिहासाचा प्रकाशझोत टाकून ते उजेडात आणण्याचा विडा उचललेला आहे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी. असं म्हंटलं जातं कि, “आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटात प्रत्येक भावनेला सूर असतो…” कारण आहे त्यांच्या चित्रपटातील हृदयाला तृप्त करणारी गाणी. गोवारीकरांच्या बहुतांश चित्रपटांना आघाडीचे संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमानच संगीतबद्ध करतात. परंतु पानिपत या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच आशुतोष गोवारीकरांनी मराठमोळ्या अजय-अतुलसोबत हातमिळवणी केलेली आहे.

. हा चित्रपट पानीपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित असून अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉन आणि संजय दत्त यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका  आहेत. या चित्रपटाचं बजेट आहे अंदाजे २८५ कोटी रुपये. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

अजय-अतुल यांनी अगं बाई अरेच्चा, जोगवा, नटरंग, सैराट यासारख्या चित्रपटांनी स्वतःला व स्वतःच्या संगीतकलेला सिद्ध केलेलं आहे. परंतु हिंदी सिनेसृष्टीत अजय-अतुलला म्हणावं तसं यश प्राप्त झालेलं नाही. हिंदीमध्ये गायब, सिंघम, अग्निपथ, ब्रदर्स या सारख्या चित्रपटांना अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं आहे. तसंच ‘विरुद्ध’ २, ‘वाह ! लाईफ हो तो ऐसी’ १ आणि ‘पीके’ चित्रपटातील एका गाण्याचं त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. ‘शॉक’ नावाच्या तेलगु चित्रपटाला आणि ‘मनसु मल्लिगे’ या सैराटच्या कन्नड रिमेकला ही अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं आहे.

आशा आहे २०१८-२०१९ अजय–अतुल आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच रोमांचकारी जाईल. अजय-अतुल आपल्या संगीतकौशल्याने हिंदी सिनेसृष्टी हि दुमदुमवून टाकतील यात मला कोणतीच शंका वाटत नाही. मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.