९८ व्या नाट्य संमेलनामध्ये रसिकांना उत्कृष्ठ कलाकृतींची मेजवानी

९८ व्या नाट्य संमेलनामध्ये रसिकांना उत्कृष्ठ कलाकृतींची मेजवानी  

एकांकिका, बालनाट्य, नृत्य नाटिका, संगीत नाटक, लोककलांचे कार्यक्रम, परिसंवाद यांसारख्या अनेक कार्यक्रमांचं ९८ व्या नाट्य संमेलनामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे सगळे कार्यक्रम सलग ७० तास दाखविण्यात आले. रात्रंदिवस चाललेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी करून हे सिद्ध केले कि पावणे दोनशे वर्षानंतर हि महाराष्ट्रातील नाट्य संस्कृती चिरतरुण आहे.

१३ जून २०१९ रोजी, कालीदास नाट्यगृह मुलुंड, मुंबई येथे सुरु झालेल्या ९८ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकप्रिय गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार विराजमान झाल्या. मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांनी हे पद स्वीकारलं. त्यावेळी मंचावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात कीर्ती शिलेदार यांनी काळाच्या मागे पडत चाललेल्या संगीत नाटकांना नवसंजीवनी देणार असल्याचा निर्णय बोलून दाखवला.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी नाट्यसृष्टीच्या कारभार आणि व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याच या वेळी सांगितलं. याची नांदी प्रसाद कांबळी यांनी नाट्य परिषदेच्या विविध शाखांना यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलामध्ये वर्षातून एकदा कार्यक्रम करण्यासाठी नाममात्र दोन हजार रुपये भाडे आकारण्यात येईल, अशा निर्णयांनी केली. सर्वच शाखांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. व्यावसायिक नाटकांसाठी हे भाडे सोमवार ते शुक्रवार ५ हजार रुपये, तर शनिवारी आणि रविवारी १० हजार रुपये आहे.

          १३ जून रोजी पहाटे ६.३० वाजता ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाने नाट्य संमेलनाची सुरुवात झाली. मग दुपारी ४ वाजता नाट्यदिंडी वाजत गाजत कालीदास नाट्यगृहात दाखल झाली. ज्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हि सहभाग घेतला होता. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन समारंभ पार पडला. रात्री ९ वाजता ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर झाला. तर १४ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता ‘पंचरंगी पठ्ठेबापूराव’ आणि त्यानंतर यमुनाबाई वाईकर यांना समर्पित असणारा ‘रंगबाजी’ कार्यक्रम पार पडला.

याच दिवशी पहाटे ६ वाजता प्रात:स्वर सत्रामध्ये राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या शास्त्रीय संगीताचा आस्वाद रसिकांना घेता आला. पुढील सत्रांमध्ये ‘तेलेजू-बालनाटय़’, ‘जंबा बंबा बू’, ‘इतिहास गवाह है’ असे नाटय़प्रयोग आणि ‘तुका म्हणे’ ही नृत्यनाटिका पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. तर सायंकाळी ६ वाजता गो. ब. देवल पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये एकूण ३८ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रमेश भाटकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. नाट्य परिषदेतर्फे व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘संगीत देवबाभळी’ने बाजी मारली असून मत्स्यगंधा, वेलकम जिंदगी, अनन्या या नाटकांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. प्रायोगिक रंगभूमीवरील ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. संगीत रंगभूमीवरील ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.  रात्री ९ वाजता काली बिल्ली प्रोडक्शनचा ‘संगीतबारी’ या कार्यक्रमाने रसिकांची दाद मिळवली

१५ जुनला १ वाजता सुरु झालेल्या झाडीपट्टी नाटक-फाटका संसार, दंडार- म्हैशासुर वध, आराधी लोकनृत्य, दशावतार – भीष्म प्रतिज्ञा आणि नमन यांसारखे लोककला प्रकार पाहून तर प्रेक्षक अगदी भारावून गेले. सकाळी ६ वाजता प्रात:स्वरमध्ये मंजुषा पाटील आणि सावनी शेंडे यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर अनुक्रमे एकपात्री महोत्सव, एकांकिका- चित्र-विचित्र, प्रायोगिक नाटक शिकस्त-ए-इश्क़, एकांकिका ‘साडेसहा रुपयांचं काय केलंस’, दुपारी तीन वाजता ‘अपूर्व मेघदूत’ हा अंध कलाकारांनी सादर केलेला नाटय़प्रयोग, सायंकाळी ५.३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पडला. तसेच समारोपानंतरही रात्री ९ वाजता संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडणारा ‘रंगयात्रा’ कार्यक्रम झाला. तर १६ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता ‘सुखन’ या नाटय़प्रयोगाचे सादरीकरण झाले. संमेलनादरम्यान सादर होणाऱ्या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश होता.

           मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.