A new face In Marathi film Industries

एक नवीन चेहरा मराठी चित्रपट सृष्टीत

जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आता मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे, मराठी चित्रपट सृष्टी नेहमीच वेगवेगळ्या विषयावरील चित्रपट बनवत असतात. अशातच अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नावीन्यपूर्ण विषयावर सिनेमा बनवला आहे. वन्स मोअर असं शीर्षक असलेल्या या सिनेमात आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा चिरंजीव असलेल्या आशुतोषचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला आहे. आशुतोषचा पहिला वहिला सिनेमा असलेला वन्स मोअर १२ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. वडील जरी संगीतकार असले तरी अभिनयाकडे वळण्याबाबत आशुतोष म्हणाला की, गाणं आणि संगीत बालपणापासूनच ऐकत आलो आहे, पण अभिनय हे माझं पॅशन आहे. बाबांनीही कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स केला नाही की अडवलं नाही. त्यामुळे हॅाटेल मॅनेजमेंटनंतर अभिनयाचं ट्रेनिंग घेऊन मालिकांमध्ये काम केलं. हा सिनेमाही मला त्यांच्यामुळेच मिळाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या सिनेमाचे निर्माते सुहास जहागीरदार बाबांना खूप मानतात. त्यांनी सिनेमात काम करण्याबाबत विचारलं, तेव्हा कथा आणि व्यक्तिरेखा ऐकून होकार दिल्याचं आशुतोषचं म्हणणं आहे.

वन्स मोर या चित्रपटाचे लेखन स्वता बिडकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते धनश्री विनोद पाटील देवस्व प्रोडक्शन आहे व विष्णू मनोहर , निलेश लवंदे अभय ठाकूर सहनिर्माते आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे . या पोस्टर वरून चित्रपटाबाबत बरीच उत्स्तुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नरेश बिडकर यांनी केले आहे. आणि तो येत्या १२ ऑक्टोबर हा सर्वत्र प्रदर्शित होत आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. या चित्रपटाचे कथानक काय आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. पण पोस्टर मात्र खूप चर्चेत आहे.

आता हा चित्रपट आशुतोष साठी काय घेऊन येणार आणि त्याची व्यक्तिरेखा काय असेल ? हे जाणून घेण्यासाठी वात पाहूया वन्स मोर या चित्रपटाची फिल्मिभोंगा मराठी सोबत …

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षाची मुणगेकरची जमली जोडी 'कियारा' हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिलावर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील. कियारा उर्फ *प्रतीक्षा मुणगेकरचा* करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड...

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे  पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा – येस सर, मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात...

मोहन जोशी  दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत ’६६ सदाशिव’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता...

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

नमुनेदार ‘बाबो’ ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना...

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

'H2O कहाणी थेंबाची'मधून शीतल अहिरराव करणार जनजागृती'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा', 'हंगामा', 'दिवाणा तुझा' या म्युझिक अल्बम्समधून शिवाय 'जलसा', 'मोल यांसारख्या चित्रपटांतून दिसणारा प्रॉमिसिंग चेहेरा म्हणजेच शीतल अहिरराव. मराठी चित्रपटसृष्टीत चमकू...

About The Author