लाल्या म्हणतात मला, ह्या रंगभूमीचा लांडगा एकच आणि तो मीच…टाळ्या

लाल्या म्हणतात मला, ह्या रंगभूमीचा लांडगा एकच आणि तो मीच…टाळ्या

आज पहिल्यांदाच असे घडले तेही मराठी चित्रपटाच्याबाबतीत. चित्रपटाचा शेवट आणि प्रेक्षकांच्या टाळ्या असे फक्त रंगभूमिवर होते ते आज मराठी चित्रपटासाठी झाले. त्या गोष्टीला मी ही साक्षीदार होते ह्याचं मला कौतुक वाटते.

अप्रतिम, अफलातून, कडक याचे वर्णन करण्यासाठी विशेषणंही तोकडी पडतात. असे हे व्यक्तिमत्व मराठी रंगभूमीचा पहिला आणि अखेरचा सुपरस्टार डॉ काशीनाथ घाणेकर. चित्रपटाच्या ट्रेलरने जशी उत्सुकता वाढवली होती अगदी तशीच चित्रपटाने कायम ठेवली आहे. आणि डॉ काशिनाथ घाणेकर हा चित्रपट एकदम कडक. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा कांचन घाणेकरांच्या ‘नाथ हा माझा’ या कादंबरीवर आधारित आहे. उत्कृष्ठ कलाकारांची निवड व त्यात योग्य असे लेखन, दिग्दर्शन याचा सुरेख मेळ प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळतो. डॉ काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत सुबोध भावे अगदी खुलून दिसतो. डॉ इरावती घाणेकर यांच्या व्यक्तिरेखा अगदी मोजक्या सीन्समधुन नंदिता पाटकरने हुबेहुब वठवली आहे. कांचन घाणेकर ही व्यक्तिरेखा वैदेही परशुरामी हीने खूपच छान वठवली आहे.

 

READ ALSO : कल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…

आनंद इंगळे यात आहेत वसंत कानेटकर, आनंदची भूमिका फार कालावधीसाठी नसली तरी भाव खाऊन गेली. वसंत कानेटकर हुबेहुब डोळ्यासमोर उभे राहतात. थोड्या कालावधीत सुमित राघवनने डॉ श्रीराम लागु यांना प्रेक्षकांना समोर आणले आणि त्यांचा अजरामर झालेला मराठी चित्रपट ‘पिंजरा’ तिल गाण्याने व जेष्ठ अभिनेत्री संध्या काही क्षणांच्या अभिनयाने चित्रपटाचा बाज वाढवला आहे. अमृता खानविलकर नसुन संध्याजी आहेत असे वाटते. जेष्ठ दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांची व्यक्तिरेखा प्रसादने पूर्ण ताकदीने साकारली आहे. चित्रपटात प्रभाकर पणशीकर आणि डॉ काशिनाथ घाणेकर यांची मैत्री म्हणजे दोस्त असावा तर असा. सूबोध भावेच्या अभिनयाला तर बिलकुल तोड नाही. सुबोधने डॉ काशिनाथ घाणेकर साकारताना घेतलेली मेहनत दिसून येते. चित्रपटात जरी प्रमुख भूमिकेत सुबोध भावे असला तरी चित्रपट सुबोधमय नसुन डॉ काशिनाथ घाणेकरमय झाला आहे. अभिनयाच्या वेडाने झपाटलेल्या अभिनेत्याची ओळख रसिक प्रेक्षकांना होते. ती ओळख सुबोधने योग्यरित्या करून दिली आहे.

चित्रपटलेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी चित्रपट चित्रित करतांना कोणतीही व्यक्तिरेखा अति किंवा कमी अशी दाखवली नाही. त्यामुळे चित्रपटाचा समतोल कायम राहतो. या दिवाळीतील अप्रतिम मेजवानी दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिली आहे. डॉ काशिनाथ घाणेकर जर मुख्य भोजन असेल तर इतर पात्रांनी त्यात गोडी वाढवायची कामगिरी केली आहे. भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, मास्टर दत्ताराम, या सर्व व्यक्तिरेखा पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत. आणि याचे सर्व श्रेय जाते ते दिग्दर्शकाला. आणि डॉ काशिनाथ घाणेकर एक अप्रतिम कलाकृती आहे. अशी की जिचा आस्वाद हा ज्याचा त्याने, जेव्हाचा तेव्हाच घेणे आवश्यक आहे. मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक उत्कृष्ट चटकदार मेजवानी आहे.

चित्रपटातील योग्य संगीत व उत्तम छायाचित्रण याच्यामुळे हा चित्रपट 1970 चा काळ योग्य पद्धतीने पडद्यावर उतरवू शकले आहे. एकूणच तांत्रिकदृष्ट्या चित्रपट अप्रतिम आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी एकदा तरी नक्की नक्की पहावा कारण चित्रपट कसा आहे? एकदम कडक…

फिल्मीभोंगा मराठीकडून आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटाला मिळतात एकदम कडक 5 पैकी 5 स्टार

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षाची मुणगेकरची जमली जोडी 'कियारा' हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिलावर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील. कियारा उर्फ *प्रतीक्षा मुणगेकरचा* करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड...

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे  पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा – येस सर, मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात...

मोहन जोशी  दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत ’६६ सदाशिव’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता...

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

नमुनेदार ‘बाबो’ ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना...

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

'H2O कहाणी थेंबाची'मधून शीतल अहिरराव करणार जनजागृती'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा', 'हंगामा', 'दिवाणा तुझा' या म्युझिक अल्बम्समधून शिवाय 'जलसा', 'मोल यांसारख्या चित्रपटांतून दिसणारा प्रॉमिसिंग चेहेरा म्हणजेच शीतल अहिरराव. मराठी चित्रपटसृष्टीत चमकू...

About The Author