आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

काय नाव रे तुझ? लाल्या …नाव? लाल्या म्हणतात मला …लाल्या लाल्या लाल्या …एक सुप्रसिद्ध दंतचिकित्सक पण अभिनयाने झपाटलेला जो व्यक्ती आपला वैद्यकीय व्यवसाय बाजूला सोडून अभिनयासाठी स्वतःला त्यात झोकून देतो. अखेर मराठी रंगभूमीचा सर्वात पहिला आणि शेवटचा सुपरस्टार होतो, असे हे व्यक्तीमत्व डॉ. काशिनाथ घाणेकर. कोणतेही मद्य अशी नशा देऊ शकणार नाही अशी नशा त्यांच्या अभिनयात होती. कोणतीही भमिका अगदी झोकून देऊन ते साकारत होते. त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश सर्वांना भारावून टाकणारा असायचा. त्यांच्या प्रत्येक नाटकासाठी प्रेक्षक खूप गर्दी करायचे. रंगभूमीवरचा लांडगा असं ते स्वतःला संबोधायचे. एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्दसंपदा कमी पडते.

बहुचर्चित आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर अतिशय भारावून टाकणारा आहे. ३.५ मिनिटाचा ट्रेलर प्रेक्षकांना अगदी खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. ट्रेलर मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेल्या विविध भूमिका तसेच त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास थोडक्यात दाखवण्यात आलेला आहे. आता पर्यंत दोन टीझर प्रदर्शित झाले त्यात पहिल्या टीझरमध्ये महत्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख दाखवली. दुसरा टीझर हा फक्त डॉ. काशिनाथ घाणेकर यांची झलक होती. ट्रेलर मध्ये बऱ्याच व्यक्तीरेखा स्पष्ट करण्यात आल्या आहे. ट्रेलर खूपच आकर्षित करणारा आहे. एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहावा असा आहे. एका अभिनेत्याचा उदय आणि अस्त यात दाखवण्यात आलेला आहे.

 

READ ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

सुबोध भावे याने डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या व्यक्तिरेखेला अगदी योग्य न्याय दिला आहे. सुबोधला पाहताना पुन्हा डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आठवणी ताज्या होतात. त्याच्या प्रत्येक संवादात डॉ. काशिनाथ घाणेकर आहे असेच भासवतो. सुबोध आपल्याला डॉ. काशिनाथ घाणेकर पर्वात घेऊन जातो अगदी सहजपणे, डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा सहप्रवासी म्हणून त्यांना सदैव साथ देणारा त्यांचा मित्र प्रभाकर पणशीकर यांची भूमिका प्रसाद ओक याने अगदी हुबेहूब साकारली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अशी कलाकृती बऱ्याच वर्षाने साकारली आहे असे म्हणण्ल्यास ते वावगे ठरणार नाही.

येत्या दिवाळीत आपण सर्व एका अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घेणार आहोत. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ८ नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होत आहे. तर बघायला विसरू नका…

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author