आणि डॉ काशिनाथ घाणेकर: आपल्यासमोर सादर करत आहे … टाळ्या

आणि डॉ काशिनाथ घाणेकर: आपल्यासमोर सादर करत आहे … टाळ्या

पहिल्यांदा रंगभूमीवर एखाद्या अभिनेत्यासाठी शिट्टी वाजली आणि तीही डॉ काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी. डॉ काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार होते. त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने इतिहास घडवला आहे. आजवर असा नट झाला नाही. अभिनय अगदी रक्तात भिनल्यासारखा अभिनय असायचा त्यांचा. त्यांनी रंगभूमीसाठी स्वतःला संपूर्णतः समर्पित केले होते. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी काही विलक्षण बदल रंगभूमीत घडवले. मराठी प्रेक्षकांना त्यांच्या नावाने अक्षरशः वेड लावले होते. त्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांचा कडकडाटात नाट्यगृह दणाणून जात होते. मराठी रंगभूमीचे हे सुपरस्टार आता मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.

 

READ ALSO : सदाबहार गाण्यांची मैफल भाग ४ 

डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका सुबोध भावे याने साकारली आहे. काशिनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीचा पहिला नव्हे तर अखेरचा सुपरस्टार आहे. आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा पहिल्यांदा सुरु केली ती काशिनाथनेच असे दमदार संवाद या टीझरमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या टीझरमध्ये सर्व कलाकारांची ओळख करून देण्यात आली होती. तर दुसऱ्या टीझरमध्ये फक्त डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यात त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे अतुलनीय असे योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस कसे आणले हे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

टीझर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. सुबोध भावे याने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका अगदी योग्य साकारली आहे. सुबोधला पाहताच डॉ. काशिनाथ घाणेकर यांची आठवण होते. सुबोध हा एक उत्कृष्ठ नट आहे. या चित्रपटात सुबोध भावे बरोबर सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओंक, सुमित राघवन, मोहन जोशी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे. १९६० च्या दशकावर आधारित असलेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे आपण अनुभवू या मराठी व्यावसायिक रंगभूमीचा सुवर्ण काळ …येत्या दिवाळीत.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author