मानवी भावविश्वाचा पैलू उलगडणारा ‘आरॉन’ चा ट्रेलर पाहिला का..?

मानवी भावविश्वाचा पैलू उलगडणारा ‘अॅरोन’ चा ट्रेलर पाहिला का..?

कोकणातलं सुंदर निसर्गरम्य गाव. त्या गावात जन्मापासून वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत केलेलं वास्तव्य. सरळ साधी माणसं आणि सरळ साधे राहणीमान. तिथल्याच एका आरॉन नावाच्या मुलाची गोष्ट असलेला ‘आरॉन’ नावाचाच, येऊ घातलेला एक नवीन मराठी सिनेमा. त्याचा ट्रेलर पाहताक्षणीच कळते की हा नात्यांचे नाजूक बंध गुंफणारा किंवा सोडवणारा सिनेमा असणार.

ज्या मुलाने लहानपणापासून आईविना आयुष्य घालवले आहे त्याच्या मनात ‘आई’ ह्या नात्याविषयी कोणत्या कल्पना असतील..? हे नाते त्या मुलाला किती आपलेसे वाटत असेल किंवा त्याला ह्या नात्याविषयी कोणतीच उत्सुकता नसेल का..? अशा मुलाचे भावविश्व ह्या चित्रपटात उलगडले जाणार असावे. 

लहानपणापासून कोकणात वाढल्याने तिथले जीवन नसानसात भिनले असताना साता समुद्रापालिकडे असलेल्या आईला भेटायची संधी मिळाल्यावर आरॉनचा प्रवास आणि त्याची आईला भेटण्याची उत्सुकता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्याचबरोबर यशोदे प्रमाणेच (कृष्णाची जन्मदात्री नसलेली पण) आरॉनचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करणारी एक स्त्री व्यक्तिरेखा देखील आपल्याला ह्या ट्रेलर मध्ये दिसते. 

 

READ ALSO : शुक्रवारची फिल्मी मज्जा

पोटचा मुलगा नसला तरी इतकी वर्ष प्रेमाने संभाळल्यावर त्या मुलाला, परतीची काहीही अपेक्षाही न ठेवता, त्याच्या खऱ्या आईकडे लांब पाठवून द्यायचे. पण तो कुठे पोचला किंवा कसा असेल ह्याचीच चिंता लागलेल्या आईची भूमिका नेहा जोशी ही अभिनेत्री खूप छान साकारेल ह्यात वादच नाही.

आरॉनचे लहानपण, त्याचे नवतारुण्य, त्याचे मित्र आणि त्याची ‘हिरवळ’ हे बाकी मजेशीर असणार. अगदी आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण करून देणारं..!

आरॉनला त्याच्या खऱ्या आईशी भेटायला नेणारा त्याचा काका म्हणजेच शशांक केतकर आणि त्या दोघांचा कोकण ते परदेश असा सगळा प्रवास खूप सुंदर असेल असे वाटते. त्यात त्या दोघांची जमलेली गट्टी आणि त्यातून फुललेलं त्यांचं नातं नक्कीच बघण्यासारखे असणार. 

परदेशातल्या आईला आरॉन आपली मानेल की ज्या मातेने स्वतःच मूल समजून आरोनला लहानच मोठं केलं, त्याला खूप माया लावली तिच्याकडेच तो परत येईल हे पाहण्यासारखे असेल. कारण ज्या व्यक्तीचं अस्तित्वच आयुष्यात नसेल तर त्या व्यक्तीबद्दल अचानक ममत्व प्राप्त होणं अवघडच, नाही का? 

असो, शेवटी आरॉन त्याच्या आईला भेटतो का ? किंवा त्याच्या आईला भेटून त्याला सर्वस्व मिळाल्याचा आनंद होतो का? रक्ताच्या नातं मोठं की प्रेमाचं नातं मोठं हे सगळं मात्र सिनेमा पाहिल्यावरच कळेल..! 

बाकी कोकणाचा असो किंवा परदेशातला, सुंदर निसर्ग ह्या सिनेमात आपल्याला भरभरून पाहायला मिळणार आहे. जेव्हा अश्या ठिकाणी शूटिंग होते तेव्हा हे अप्रतिम निसर्गसौंदर्य आपण दुर्लक्षित करूच शकत नाही. गोड माणसे, भावभावना आणि निसर्ग ह्याची कशी सांगड घातलेली आहे हे पाहण्यासाठी आरॉन हा चित्रपट पाहावाच लागेल.. तूर्तास ट्रेलर तरी पाहून घ्या..!!

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author