आरॉन

आरॉन:

नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. पण नावात बरेच काही आहे. नाव आपल्याला ओळख देते. आपले नाव आपल्याला आपल्या अस्तित्वाशी जोडते. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे आपले नाव सूचित करते. एखाद्यचे नाव जर अनोखे असेल तर आपण म्हणतो याचा अर्थ काय? किंवा किती वेगळे नाव आहे? असेच काहीसे एका आगामी चित्रपटाबद्दल आहे ज्याचे नाव आहे‘आरॉन‘. आहे ना अनोखे नाव? नावावरून हा मराठी चित्रपट नक्कीच वेगळा असणार असेच सूचित करतो. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे नक्कीच वेगळे कथानक असावे. नुकतेच या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरपण त्याचे वेगळेपण सिद्ध करतं. त्यात मराठी कलाकारांप्रमाणे दोन परदेशी कलाकार दिसतात. ते परदेशी कलाकार हे फ्रेंच कलाकार आहेत. या दोन फ्रेंच कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. बर्नाबास तोथ व अँटोनिएट फेकेटे अशी त्यांची नावे असून या परदेशी कलाकारांबद्दल आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

‘जिएनपी फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. टेलिव्हिजन, नाटक व मराठी चित्रपट माध्यमांतून नावारूपास आलेले कलाकार शशांक केतकर व नेहा जोशी यात एकत्र दिसणार आहेत. तसेच ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये याची ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वास्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करीत आहे.

‘आरॉन’ या चित्रपटाची हैदराबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व पाँडिचेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथेदेखील साऊथ आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली होती. सर्वच चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले आहे. कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भरलेल्या द वर्ल्ड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘आरॉन’ ला “बेस्ट इन्स्पिरेशनल फॅमिली जर्नी’’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जगभरातील चित्रपट महोत्सव गाजवून ‘आरॉन‘ आता ७ डिसेंबर २०१८ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author