आरॉन: गोष्ट एका प्रवासाची

आरॉन: गोष्ट एका प्रवासाची

आयुष्य म्हणजे प्रवास. आयुष्यात आपण प्रत्येक वळणावर प्रवास करत असतो. प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी देऊन जातो. कधी प्रेम कधी माया कधी दुःख तर कधी हसू आणि कधी हरवलेली नाती. खरंय ना…? आपल्या आयुष्यातील प्रवास कुठल्यातरी कारणासाठी खूप महत्वाचा होऊन जातो आणि कायम आपल्या लक्षात राहतो. अश्या एका सुंदर कथानकावर आधारित आरॉन ह्या मराठी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

READ ALSO : गुलाबजामची चव आवडली का? तर मग वय विचारू नका…

नावात काय आहे? असे शेक्सपियर म्हणतो पण नावात खूप काही दडले आहे. आरॉन हे नाव खूप वेगळे व आकर्षक आहे. या चित्रपटात खूप सुंदर प्रवासवर्णन आहे. चित्रपटाचा टिझर चित्रपटाच्या कथानकाची एक सुंदर झलक देऊन जातो. या चित्रपटाच्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. प्रेक्षक या नवीन धाटणीच्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार यात काहीच शंका नाही.

मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमधून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आपल्याला ह्या चित्रपटात दिसणार आहे. शशांकच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. आरॉन चित्रपटातील त्याची भूमिका देखील नक्कीच वेगळी आणि प्रेक्षकांना खुश करणारी असेल हे टिझर पाहून कळते. ह्या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे परदेशात झाले आहे आणि ह्यामध्ये दोन फ्रेंच कलाकार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वास्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय अभिनेत्री नेहा जोशी आणि अथर्व पाध्येदेखील ह्या चित्रपटात दिसणार आहेत.

अजून एक खास बात म्हणजे या चित्रपटाची हैदराबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व पाँडिचेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे देखील साऊथ आशियाई फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली होती तसेच ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ देऊन पसंतीसुद्धा दर्शवली होती. द वर्ल्ड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘आरॉन’ ला “बेस्ट इन्स्पिरेशनल फॅमिली जर्नी’’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर निर्मित आणि ओमकार रमेश शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट ७ डिसेंबर २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आरॉन चा टिझर बघीतला नसेल तर नक्की बघा, आणि त्याच्या प्रवासात सामील व्हा.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author