वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना लाटणाऱ्या सरकारी यंत्रणेला वठणीवर आणायला येतोय ‘आसूड’

वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना लाटणाऱ्या सरकारी यंत्रणेला वठणीवर आणायला येतोय ‘आसूड’.. पहा पेटून उठलेल्या शेतकऱ्यांची कथा मोठ्या पडद्यावर लवकरच..

शेतकऱ्यांची तरुण पिढी काय करते आहे सध्या? असा जर प्रश्न कुणी विचारला तर उत्तर काय असू शकेल? शिकलीये खूप पण शेती नाही करत. शहरात कामधंदा शोधायला चाललेत सगळे शिकले सवरलेले तरुण. शेतीत काय राहिलं नाई आता. पाऊस पाणी चांगला नाही, पैसा शिल्लक राहत नाई, पिकवणार काय अन खाणार काय? अशा निराशेच्या स्वरात उत्तर मिळतं ह्या तरुण शेतकऱ्यांकडून. शेतीचा तिरस्कार करायला लागलेत हे तरुण. कष्टाचं काही चीजच होत नाही मग काय करणार शेती करून. गावात रोजगार नाही, सरकारी योजना ते सरकारी अधिकारीच खातात.आमच्या पर्यंत काही पोचतंच नाही, म्हणून धरतोय शहराचा रस्ता.

एक तरुण शेतकरी असाच शिकला सवरला, बी एस्सी अग्रीकल्चर झाला, पण ह्याच निराश विचारांनी शेतीकडं पाठ फिरवली आणि सरळ शहरात गेला. ‘सुख अनुभवायला’. इकडं ह्या काळ्या आईचा आक्रोश चालूच होता. आशा काही घटना घडल्या की ह्या तरुणाला त्या काळ्या आईच्या आकांतामुळे परत गावाकडं धाव घ्यायला लागली. आणि जे काही त्यानं गावात येऊन बघितलं त्या सगळ्या गोष्टींनी त्याच्यातला खरा शेतकरी जागा झाला. आणि पेटून उठला त्या सगळ्या सरकारी यंत्रणे च्या विरुद्ध. त्यानं हातात घेतला ‘ आसूड’. आणि सुरुवात केली एकेकाला वठणीवर आणायला. कोण आलं त्याच्या मदतीला आणि कोणा विरुद्ध त्याने उगारला हा फटक्यांचा ‘आसूड’ ?

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

हे सगळं पाहायला तुम्हाला जायला लागणार आहे सिनेमा थिएटर मध्ये, कारण ह्याच घटना रुपेरी पडद्यावर पाहताना त्यातली खरी खरी कोडी उलगडत जाणार आहेत, आणि ह्या तरुणाने कसा विजय मिळवला ते पाहायला खरी मजा येणार आहे. “आसूड” नावाचा कडक चित्रपट लवकरच येतोय सगळ्या तरुण पिढीला एक ‘थ्रिल’ अनुभवायला. आणि ह्यातली प्रमुख आणि वेगळी भूमिका साकारणार आहे एक उमदा तरुण, ज्याचं नाव आहे ‘ अमित्रीयान पाटील ‘ रांगडा शेतकरी म्हणून ही भूमिका ठरणार आहे खूपच जबरदस्त. ‘सत्या-२,’ ‘मन्या दि वंडरबॉय’ , ‘332 मुंबई टू इंडिया’ , ‘राजवाडे अँड सन्स’, असे हिंदी आणि मराठी चित्रपट अमित्रीयान ने गाजवले आहेत. आणि ह्या आसूड मध्ये आहेत मराठीतले बरेच दिग्गज कलावंत , विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर , अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत, राणा जंगबहादूर, अवतार गिल, आणि ‘रश्मी राजपूत’ हा नवीन चेहेरा आहे , म्हणून एकदम कडक असणार आहे हा चित्रपट. बघायला विसरू नका बरं का. येत्या ८ फेब्रुवारीला. “आसूड”

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author