लवकरच सुरभी हांडे अडकणार लग्नाचा बेडीत

खंडेरायच्या म्हाळसाच्या आयुष्यात तिचा खर्या आयुष्यातील खंडेराय भेटला आहे. नुकताच ‘जय मल्हार ‘ मधील प्रसिद्ध अभिनेत्री व खंडेरायाची अर्धांगिनी म्हाळसा म्हणजे सुरभी हांडे हिचा नुकताच साखरपुडा झाला. ‘जय मल्हार ‘ या पौराणिक मालिकेद्वारे सुरभी प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. जय मल्हार या मालिकेमुळे सुरभी प्रसिद्धीच्या झोतात आली. म्हाळसाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले.  सुरभीने अभिनय क्षेत्रात अगदी महाविद्यालयीन काळापासून सुरुवात केली. सर्वच कलाकार त्यांच्या अभिनयाचा श्री  गणेशा नाट्यक्षेत्रापासून करतात यात सुरभी सुद्धा अग्रगण्य आहे. अभिनयाचा श्रीगणेशा तिने ‘स्वामी’ या नाटकापासून केला. तेव्हा ती १६ वर्षाची होती . तिने ऑल इंडिया रेडीओ तही काम केले आहे. ‘ सुगम संगीत कार्यक्रम ‘ हा तिचा रेडीओवरील कार्यक्रम होता.

READ ALSO : हृदयात समथिंग समथिंग

सुरभी ही मुळची जळगावची तिचे शिक्षण आणि बालपण हे नागपुरातील, सुरभीने मानसशास्त्रात पदवी घेतली आहे; नागपूरच्या एल. ए. डी. महाविद्यालयातून. सुरभीच्या आंबट गोड मधील खलनायिकेच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली मात्र सुरभीला खरी प्रसिद्धी मिळाली ती झी मराठीवरील ‘जय मल्हार ‘ या मालिकेद्वारे, या मालिकेतील तिची भूमिका वाखाण्याजोगी होती. टीव्ही मालिकेबरोबरच सुरभीने मराठी चित्रपटात देखील अभिनय केला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘आग बाई आरेच्या २ ‘ या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.

सध्या सुरभी कलर्स मराठीवरील ‘लक्षी सदैव मंगलम ‘ या मालिकेत अभिनय करत आहे. या मालिकेत तिच्या सोबत ओमप्रकाश शिंदे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत आहे. सुरभीला अभिनयाबरोबर गायन व छायाचीत्राकरिता याची आवड आहे.

सुरभी हांडेचा साखरपुडा रविवारी जळगाव मध्ये झाला. तिचा होणारा पती हा मूळचा जळगावचा आहे. दुर्गेश कुलकर्णी आणि सुरभी हांडे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात. ते दोघेजरी भिन्न क्षेत्रातील असेले तरीही त्या दोघांना त्यांच्या क्षेत्राबद्दल माहिती आहे. त्यांचे क्षेत्र आणि तेथील विषय याबद्दल दोघेही भरपूर गप्पा मारतात. आता फक्त त्यांचा साखरपुडा झाला असून विवाह तरी पुढच्या वर्षी होणार आहे. विवाहानंतर सुद्धा ती तिचा अभिनय सुरु ठेवणार आहे. तिला तिच्या साखर पुड्या बद्दल प्रेक्षकांनी तिला खूप खूप शुभेछ्चा  दिल्या आहे.

तसेच तिला तिच्या भावी आयुष्यासाठी फिल्मिभोंगा मराठी कडून खूप खूप शुभेछचा. सुरभी अशीच प्रेक्षकांना अभिनयाद्वारे भेटत राहा .

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author