अभिनेता प्रियदर्शन जाधवचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण

अभिनेता प्रियदर्शन जाधवचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण

‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या  ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आला. अभिनेता प्रियदर्शन जाधवचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण असलेल्या ‘मस्का’ मध्ये सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित ‘मस्का’ हा चित्रपट रॉमकॉन शैलीचा आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’च्या टीझर मध्ये भन्नाट अशा गर्ल नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे. तसेच या टीझर मध्ये अनिकेत विश्वासराव आणि चिन्मय मांडलेकर यांच्यातील संवादावरून या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार आहे असे दिसते. या शिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार टीझर मध्ये दिसले आहेत. ‘मस्का’ मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.

‘मस्का’ या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. लेखक, अभिनेता, नाट्यदिग्दर्शक असलेले प्रियदर्शन जाधव या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. प्रियदर्शनची विनोदी शैली आणि टीझर मध्ये असलेला सस्पेन्स यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत. मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार चिनार – महेश यांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटाचे छायांकन अमलेंदू चौधरी यांचे आहे आणि निलेश नवनाथ गावंड संकलक आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू मसाला असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘मस्का’ चा टीझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षाची मुणगेकरची जमली जोडी 'कियारा' हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिलावर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील. कियारा उर्फ *प्रतीक्षा मुणगेकरचा* करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड...

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे  पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा – येस सर, मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात...

मोहन जोशी  दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत ’६६ सदाशिव’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता...

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

नमुनेदार ‘बाबो’ ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना...

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

'H2O कहाणी थेंबाची'मधून शीतल अहिरराव करणार जनजागृती'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा', 'हंगामा', 'दिवाणा तुझा' या म्युझिक अल्बम्समधून शिवाय 'जलसा', 'मोल यांसारख्या चित्रपटांतून दिसणारा प्रॉमिसिंग चेहेरा म्हणजेच शीतल अहिरराव. मराठी चित्रपटसृष्टीत चमकू...

About The Author