अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण

अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैंमधून मराठी चित्रपटात पदार्पण

मराठी चित्रपट त्याच्या आशय संपन्नतेसाठी देश पातळीवर ओळखला जातो. आशयसंपन्न आणि वेगळेपण यामुळेच विविध प्रादेशिक सिनेमा आणि बॉलीवूड मधील आघाडीचे कलाकारही मराठीमध्ये काम करण्यास उत्सुक असतात. दाक्षिणात्य आणि बॉलीवूड मध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली अभिनेत्री फ्लोरा सैनी आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. योगायतन फिल्मस प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटातून फ्लोरा सैनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह यांनी ‘परी हूं मैं’ची निर्मिती केली असून रोहित शिलवंत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची असून संगीत समीर सप्तीसकर यांचे आहे.

 

READ ALSO : या गुणी कलाकारांनी घेतली अकाली एक्झिट

फ्लोरा सैनी या चित्रपटात एका सिने अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे, तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात तेलगु चित्रपटातून केली, त्यानंतर तमिळ, कन्नड, पंजाबी आणि हिंदी भाषेत ५० हून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग २’, ‘बेगमजान’, ‘धनक’ आदी हिंदी चित्रपटातील फ्लोराच्या भूमिका विशेष गाजल्या. दिघे कुटुंब आणि टीव्ही मालिका, रियालीटी शो भोवती फिरणाऱ्या अत्यंत मनोरंजक अशा ‘परी हूँ मैं’ मध्ये फ्लोरा सैनीसह अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टीव्हीच्या छोट्या पडद्याने सामान्य माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे, याच ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा ‘परी हूँ मैं’ हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author