आदिनाथ कोठारेचे दिग्दर्शनात “पाणी “ या चित्रपटाद्वारे पदार्पण

पहिल्यांदाच आदिनाथ कोठारे दिग्दर्शन करणार आहे. आदिनाथ हा एक अभिनेता आहे आणि तो अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आता तो एक दिग्दर्शक म्हणुन समोर येत आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रियांकाचा चौथा मराठी चित्रपट आहे व त्याचे नाव ‘पाणी’ असे आहे. तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल पिक्चर्स’चा आणखीच एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पाणी’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदीनाथ कोठारे करणार आहे. अभिनयात आपली ओळख निर्माण करणारा आदिनाथ पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहे. दिग्दर्शक म्हणून आदिनाथचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं अनेकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अमिर खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हातभार लावायला सुरूवात केली आहे. जनजागृती मोहिमेद्वारे अनेक चित्रपट कलाकारांनी पुढे येऊन लोकांना या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्याचं आव्हान केलं आहे. पाण्याच्या भीषण समस्येवर प्रकाश टाकणारा ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाड्यातील सत्य घटनेवर आधारित असणार आहे. नगरवाडीमधल्या एका व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी यात पाहायला मिळणार आहे.

गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यानं एकही मुलगी या गावात लग्न करायला तयार होत नाही. त्यामुळे नायकाचं लग्न जुळण्यासही अडचणी येत असतात अशा वेळी गावातील प्राण्याचा प्रश्न तो कसा सोडवतो हे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

प्रियांकानं ट्विट करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. व्हेंटिलेटर, काय रे रास्कला, या चित्रपटानंतर ‘पर्पल पेबल पिक्चर्स’चा हा चौथा मराठी चित्रपट असणार आहे. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’चा ‘फायरबँड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराजे पाटील करणार आहेत.
या संधी बदल आदिनाथने प्रियांकाचे आभार मानले आहे. आणि यात काहीच शंका नाही की तो एक दिग्दर्शक म्हणुन स्वतःला नक्की सिद्ध करेल. या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. आता पुढील वाटचालीसाठी आदिनाथ कोठारेला आणि प्रियांका चोप्रा हिला देखील खूप खूप शुभेच्छा, आणि चित्रपटाची प्रतीक्षा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author