प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांची पुढील २ वर्षामधील कार्यसूची

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांची पुढील २ वर्षामधील कार्यसूची

रवी जाधव यांना आपण एक प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. गेल्या ९ वर्षात दिग्दर्शन, लेखन, निर्मिती या क्षेत्रात त्यांनी नवनवीन प्रयोग केलेले आहेत. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या, प्रसाद ओक यांच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाद्वारे त्यांनी एक चांगला अभिनेता म्हणून हि ओळख मिळवलेली आहे. अशा या अवलियाचे पुढच्या २ वर्षातील योजना काय आहेत.. हे आज आपण जाणून घेणार आहोत..

  • दिग्दर्शक रवी जाधव, रितेश देशमुख यांच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ या बॅनरखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. ज्याचं काम गेले दोन वर्ष चालू आहे आणि अजून या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. याविषयी बोलताना रवी जाधव म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जी कलाकृती साकारायची आहे ती अतिशय भव्यदिव्य असणार आहे, म्हणूनच याला खूप वेळ लागतोय, आणि तो वेळ लागलाच पाहिजे कारण राजांवर बनणारी कलाकृती घाई घाईत बनविण्याचा त्यांचा मानस अजिबात नाही.”
  • रवी जाधव यांनी गेल्या वर्षी ‘रंपाट’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तरुणाईची एक आगळी वेगळी गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडीओ आणि मेघना जाधव करत आहेत.
  • ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर रवी जाधव यांना अभिनयाचे अनेक प्रस्ताव येत आहेत. त्यातील एक हिंदी आणि एक मराठी अशा दोन चित्रपटांच्या कथा रवी जाधव यांना भावलेल्या आहेत आणि कदाचित ते या दोन्ही चित्रपटात आपल्याला अभिनेता म्हणून पाहायला मिळतील.
  • रवी जाधव यांनी स्वतःच्या काही संगीतरचना तयार करून ठेवल्या होत्या, एका दिग्दर्शकाला त्या खूप आवडल्या. त्या दिग्दर्शकांनी रवी जाधव यांना त्या रचना स्वतःच्या चित्रपटात घेण्याबाबत विचारले असता, रवी जाधव यांनी त्या दिग्दर्शकाला त्या संगीतरचना देण्याचं कबूल केलं. आता पुढच्याच वर्षी रवी जाधव यांचं संगीत असलेला तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच दिग्दर्शक, लेखक, निर्माते, अभिनेते, अशी बिरूदं मिरवणारे रवी जाधव पुढच्या वर्षापासून ‘संगीतकार’ असं हि बिरूद मिरविण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

     मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author