‘अजय देवगण’ आता येतोय एका रांगड्या ऐतिहासिक रोलमध्ये’. सांगायला इतिहास मराठी मातीतला , इतिहास निष्ठावान लढवय्या योध्याचा. इतिहास जिवाभावाच्या सवंगड्याचा..!!

 

‘अजय देवगण’ म्हणजे ‘आता  माझी सटकली’. बेफाम ऍक्शन चा बादशहा. एक लाथ मारल्यावर समोरचा दोन मजले उंच उडून रापकन अपटतो.  पण  त्याची असली ऍक्शन लोकांना खूप आवडली  म्हणून तर  त्याचा ‘सिंघम’ जबरदस्त चालला. भरपूर कमाई केली. आता पोलीस   इन्स्पेक्टर  चा रोल अजय देवगणनेच करावा इतका तो प्रेक्षकांना आवडला आहे, म्हणून शेवटची दहा मिनिटे येऊन  ‘रणबीर’ च्या “सिम्बा” मध्ये अजय देवगण भाव खाऊन गेला.

आता एक लढवय्याच पण ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे हा रांगडा गडी. एक मजबूत भूमिका आहे ही, ज्या योध्याचं नाव महाराष्ट्रात माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही. कारण त्याच्या नावातच एवढी ताकत आहे की नुसतं त्याचं नाव घेतल्यावर अंगातलं रक्त सळसळ करतं. अंगात वीरश्री संचारते. आणि  बेंबीच्या देठापासून  एकच  घोष  बाहेर पडतो.   “” हर  हर  महादेव  “” कारण  डोळ्यासमोर उभा राहतो तो “छत्रपती शिवरायांचा  जिवा भावाचा,  एकनिष्ठ, सरदार   “तानाजी  मालुसरे”.. जीवाला जीव देणारा , शूर वीर, अंगात दहा हत्तीचं बळ असणारा  ‘तानाजी मालुसरे’. ह्या मराठी मातीतला जिगरबाज मावळा. तानाजी शत्रूवर चालून गेला की ‘जीत’  ही ठरलेलीच. महाराजांचा  उजवा  हातच जणू.  बुलंद आवाज , बलदंड शरीर, बघितल्यावर शत्रूचा थरकाप होईल अशा पिळदार मिशा. असा हा ‘नरवीर’ ‘तानाजी’. म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक मजबूत खांब.

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

ह्या ‘तानाजीची’ महती तुम्हा आम्हाला मोठ्या रुपेरी पडद्यावर पाहायला निश्चितच आवडणार आहे . कारण फक्त ‘तानाजी मालुसरे’ उभा करणारा एकही चित्रपट आत्तापर्यंत  तयार केला गेला नाही. म्हणून ह्या चित्रपटाला अवघ्या महाराष्ट्राची पसंती असेल हे ही निश्चित. आता अजय देवगण ह्या भूमिकेला कसा न्याय देतोय ते बघायचंय. हा मराठी मातीतला चित्रपट आहे त्यामुळे ह्यात मराठी कलाकार सुद्धा असणार, पण  ‘अजिंक्य देव’  शिवाय अजून कोण मराठी कलाकार आहेत हे कळायला थोडं थांबच.  दुसऱ्या एका कलाकाराचं नाव कळलंय, तो हिंदी सिनेमातला गाजलेला अभिनेता आहे त्याला कोंडण्याचा मोगल साम्राज्यातला रजपूत सरदार म्हणजे ‘उदयभान’ ही भूमिका मिळाली आहे. आणि तो अभिनेता म्हणजे  ‘ सैफ अली खान’ असणार आहे. शिवाय ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक हा मराठी आहे , त्यामुळे ह्या सिनेमाला चांगला मराठी बाज असणार आहे.  मग तयार राहा, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि थेटर मध्ये हर हर महादेव चा गजर होणार आहे..

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...