अजय गोगावले म्हणताहेत ‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे’

अजय गोगावले म्हणताहेत इकडून तिकडे, तिकडून तिकडे

होम स्वीट होमसाठी अजय गोगावलेंनी गायले चक्क वेस्टर्न  स्टाईल गाणे

गायक अजय गोगावले यांनी आपल्या खास शैलीतील गायकीने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीचा खास पारंपारिक भारतीय संगीताचा लहेजा आहे, मात्र घर आणि घरातील नात्यांचा गोडवा विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटात त्यांनी चक्क एक वेस्टर्न  बाजाचे गाणे गात आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. या गाण्याचे संगीत संतोष मुळेकर यांचे आहे. ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषीकेश जोशी यांनी केले आहे.

READ ALSO : अभिनेता संतोष जुवेकर अडचणीत

‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार संतोष मुळेकर म्हणाले, अजय गोगावले सॉलिड गायक आहेत, त्यांनी आजपर्यंत गायलेली गाणी ही पारंपारिक आणि लोकसंगीताच्या शैलीत मोडणारी आहेत. परंतु ‘होम स्वीट होम’ साठी त्यांनी गायलेले ‘इकडून तिकडे’ हे गाणे त्यांच्या शैलीपेक्षा पूर्णपणे निराळे असे वेस्टर्न शैलीत मोडणारे आहे. ते स्वतः संगीतकार असल्यामुळे समोरच्याला नक्की काय हवे आहे हे समजून घेतात आणि गाण्याला अधिक उंचीवर घेउन जातात. वैभव जोशी यांच्या सुंदर शब्दांमध्येच गाण्याची चाल दडलेली होती, त्यामुळे ती संगीतबद्ध करणे सोपे झाले तर अजय यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत.

‘होम स्वीट होम’ चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हल्पमेंट वर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author