बाजीराव पेशवे बल्लाळ ह्यांच्या महानाट्याचा रोमांच अनुभवण्यास तयार राहा.

रसिकहो मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवणारे बाजीराव पेशवे बल्लाळ ह्यांच्या महानाट्याचा रोमांच अनुभवण्यास तयार राहा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे सेवक, अजिंक्य, अजेय अशा तडफदार व्यक्तिमत्वाचे, स्वराज्याचे पेशवे बाजीराव बल्लाळ ह्यांचे युग लवकरच अवतरणार एका भव्यदिव्य महानाट्यातून. दक्खन पासून ते आत्ताच्या पाकिस्तानात असलेल्या अटक ह्या गावापर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार ज्यांनी केला ते बाजीराव पेशवे. वयाच्या चाळीस वर्षात चव्वेचाळीस युद्ध जिंकणाऱ्या बाजीरावांचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे..! छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे ह्या दोघांवरची महानाट्य या आधी रसिकांनी अनुभवलीच आहेत. त्यामुळे ते किती भव्यदिव्य असते ह्याची कल्पना सगळयानाच असणार. ह्या नाटकाची प्रमुख भूमिका गश्मीर महाजनी करणार आहे.  म्हणजे बाजीरावांच्या ऐतिहासिक भूमिकेत गश्मीरला पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यातून समोर सगळा लाईव्ह ऑडियन्स म्हणजे ह्या महानाट्याची आगळी वेगळी झिंग गश्मीरला अनुभवायला मिळेल. 

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांचा इतिहास आधी बॉलीवूड च्या ‘बाजीराव मस्तानी’ ह्या सिनेमातून दाखवण्यात आला होता. पण त्यात बाजीरावांना फक्त मस्तानीबाईंचे प्रियकर इतकेच संकुचित केले होते. त्यांचे शौर्य, त्यांनी लढलेल्या लढाया आणि चाणाक्षतेने अटके पार नेलेले साम्राज्य ह्याचा लवलेशही नव्हता. एखाद्या बॉलिवूड लव्ह स्टोरी प्रमाणेच तो चित्रपट बनवला गेला होता. परंतु ह्या महानाट्यामधून बाजीरावांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला जावं म्हणून खास मेहनत घेतली गेली आहे. ह्याचे दिग्दर्शक वरुणा मदनलाल राणा आणि लेखक प्रताप गंगावणे ह्यांनी तब्बल दोन वर्षे ह्या इतिहासावर काम केले आणि नाटकाची संहिता लिहून काढली. महानाट्य म्हटल्यावर १०० एक फुटांचा भव्यदिव्य रंगमंच आणि अप्रतिम नेपथ्य ह्यावर खास काम करणे गरजेचे होते. कलादिग्दर्शक आबीद शेख ह्यांच्या कडे नेपथ्याची धुरा सांभाळायला दिलेली आहे. ह्या नाटकास पेशवाई थाटाची किनार असेलच. नाटकातील सगळया पात्रांसाठी उंची वस्त्रे, अलंकार आणि युद्धास लागणारे घोडे, अस्त्रे या सगळ्यांची तयारी जोरदार सुरू आहे. 

अतिभव्य अशा नाटकात मुख्य कलाकारांसोबत जवळपास १३० कलाकारांची भूमिकाही असेतील. नाटकाचे संगीत हे आदी रामचंद्र ह्यांचे असून वैशाली माडे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, आदी रामचंद्र आणि आदर्श शिंदे असे उत्तम गायक ही महानाट्याची जमेची बाजू म्हणावी लागेल.. ह्या नाट्याला ‘अजिंक्य योद्धा’ ह्या पेक्षा कोणतेच नाव चपखल असू शकत नाही. ह्याचा शुभारंभ लवकरच म्हणजे १८ व १९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता अंधेरीच्या होली फॅमिली शाळेच्या पटांगणात होणार आहे. तर मंडळी ह्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या महानाट्याचा अनुभव नक्की घ्या आणि तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका..!! 

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author