रोहित शेट्टीचे मराठी ढंगाचे सिनेमे बंद होणार.!! कारण सिंघमची जागा घेतली दुसऱ्या हिरो ने..

रोहित शेट्टीचे मराठी ढंगाचे सिनेमे बंद होणार.!! कारण सिंघमची जागा घेतली दुसऱ्या हिरो ने..

सिनेमे कोणत्याही भाषेतील असो पण चित्रपट प्रत्येक दिग्दर्शकाची सिनेमा बनवताना स्वतःची एक शैली असते. जसे ह्रिषिकेश मुखर्जींचे सिनेमे पूर्वी निखळ मनोरंजन करायचे. बडजात्या बंधू कौटुंबिक सिनेमेच बनवताना दिसतात. राम गोपाल वर्माचा ढंग म्हणजे सस्पेन्स आणि खून खराबा.. करण जोहर म्हणाल तर सगळं कसं तरुण, गुलाबी आणि अशक्य..!! पण अजून एका दिग्दर्शकाच्या शैलीबद्दल बोलायचे म्हणजे त्याच्या सिनेमात कायम ‘मराठी’ वातावरण असते. मराठी संवादही असतात. इतकेच काय तर अर्धा एक डझन मराठी कलाकार सुद्धा असतातच. आता हा कोण हे सांगणे न लगे.. रोहित शेट्टी जो आपल्या सिनेमात कायम मराठमोळं वातावरण राखतो त्यामुळे त्याचे चित्रपट मराठी माणसाला अगदी जवळचे वाटतात. तो बॉलिवूडचा असला तरी आपला वाटतो.

तसं बघायला गेलं तर दिग्दर्शकाला काही ठराविक लोकांसोबत काम करायला सुद्धा  नेहमीच आवडते. त्यांची एकमेकांशी चांगलीच भट्टी जमते. संजय लीला भन्साळीला त्याच्या चित्रपटात दीपिका लागते. तर सतीश राजवाडे कायम स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ला चित्रपटात घेतो. अगदी तसंच काहीसं रोहित शेट्टीचं आहे. त्याचे ‘अजय देवगण’ शिवाय पान हलत नाही म्हणा ना..!! गोलमाल – फन अनलिमिटेड पासून गोलमाल वन्स अगेन पर्यंत असो किंवा सिंघम भाग एक आणि सिंघम भाग दोन असो.. बोलबच्चन, ऑल द बेस्ट, संडे, जमीन हे आणखी काही असो.. नाही तर फुल और काटे पासून राजू चाचा पर्यंत सह दिग्दर्शक म्हणून असो रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही जोडगोळी बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहे.

 
 

READ ALSO : गोंडस चेहरा असूनही खलनायकी रूपातच का आवडतोय जितेंद्र जोशी?

ह्या सगळ्या सिनेमात कुठे ना कुठे असलेले रोहित शेट्टीचे मराठी प्रेम पाहता त्याचे सिनेमे मराठी मनाला भुरळ घालतात. पण खबर अशी आहे की आता रोहित अजय देवगण ला डच्चू देऊन वेगळ्या अभिनेत्यांसोबत गट्टी जमवणार आहे. शाहरुख खान आणि रणवीर सिंग बरोबर त्याने सिनेमे केलेच आहेत. आणि आता पुढचा सिनेमा देखील अजय देवगणला सोडून ‘अक्षय कुमार’ बरोबर करणार आहे.. जरी चेन्नई एक्सप्रेस मध्ये मराठमोळं असं काहीच नव्हतं पण आगामी रणवीर सिंगला घेऊन येणाऱ्या सिम्बा मध्ये मात्र पुन्हा सगळं मराठी कल्चर दिसून येतंय. हिरो आणि खलनायक दोघेही मराठी ढंगातच आहेत. मग आता प्रश्न असा आहे की खिलाडी अक्षय कुमार ला घेऊन पुढचा चित्रपट येणार असेल तर त्याची शैली कोणती असेल..?

इतके दिवस अजय देवगण बरोबरची केमिस्ट्री आणि मराठी वळणाचा दक्षिणी मसालापट पाहिल्याने आता सगळ्यांना उत्सुकता नक्कीच वाटेल की रोहित शेट्टी अक्षय ला घेऊन नक्की कसा सिनेमा बनवेल..? ‘ मराठी ’ पणा असेल की काही वेगळ्याच धाटणीचा असेल. त्याही उप्पर आमचा मराठी बाजीराव सिंघम एकटा पडेल ते वेगळेच..!! बाकी काहीही असो बॉलिवूड मध्ये मराठीची शान जपणाऱ्या रोहितला पुन्हा एकदा मराठी – दक्षिणी चित्रपट काढण्याची सुबुद्धी मिळो..!! अजय देवगण असो वा अक्षय कुमार पण सिनेमात मराठी टच असुदेत रे महाराजा..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author