अक्षय कुमार गाजवणारी २०१९ चे वर्ष. चाहत्यांसाठी तब्बल ५ चित्रपटांची मेजवानी..!

अक्षय कुमार गाजवणारी २०१९ चे वर्ष. चाहत्यांसाठी तब्बल ५ चित्रपटांची मेजवानी..!

डॅशिंग हीरो म्हटलं की समोरअक्षय कुमारउभा राहतो. काहींतरी विशेष असतं त्याच्या सिनेमात, म्हणून तर आपण सगळे त्याचे फॅन आहोत. स्टंट करावा तर अक्षय कुमारनेच. कारण त्यानं मार्शल आर्ट चं ट्रेनिंग घेतलेलं आहे. मुंबईत आल्यावर सुरुवातीला पोट भरण्यासाठी, ह्या ट्रेनिंगचा अक्षयला उपयोग झाला.संध्याकाळी तरुण मुलांना मार्शल आर्ट शिकवून त्याने पैसे मिळवायला सुरुवात केली. आणि त्यातल्याच एका तरुण मुलाच्या सांगण्यावरून मॉडेलिंग ला सुरुवात केली. मग त्यात जरा जास्त पैसे मिळायला लागले. मॉडेलिंग साठी केलेल्या फोटोशूट मुळे एका चित्रपटात छोटं काम मिळालं. त्यात झळकल्यावर  एका चित्रपटात नायक म्हणून काम मिळाले. आणि नंतरखिलाडीहा चित्रपट मिळाला.खिलाडी च्या अफलातून भूमिके नंतर अक्षय ची गाडी नॉन स्टॉप पळायला लागली. पण ह्या सगळ्या यशासाठी त्याने जीवतोड मेहेनत केलीआहे, म्हणून आज तो आपला आवडता हीरो झालाय

अक्षय कुमारचं खरं नाव काय माहितीये का तुम्हाला?   ‘राजीव भाटीया‘. हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून सांगतो. अमृतसरचा हा पक्का पंजाबी हीरो आहे. शिक्षण दिल्लीत झालं अक्षयचं. आणि नंतर मुंबई गाठली. आणि झाला बॉलिवूड स्टार. बाकी सगळे हीरो वर्षभरात एक दोन चित्रपट करतात, पण अक्षयचा स्पीड जरा जास्तच असतो इतरांपेक्षा एखादा चित्रपट जास्तच असतो.२०१८ मध्ये त्याचे दोन चित्रपट जबरदस्त गाजले. ‘पॅड मॅनआणिगोल्ड‘.  पण ह्या वर्षी म्हणजे २०१९ सालात त्याचे दोन नाही, तीन नाही , तर मोजून पाच चित्रपट येतायत आणि सगळे एकापेक्षा एक. म्हणून ही मेजवानी आहे मेजवानी.

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

  • पहिला अक्षय कुमारचा सिनेमा येतोयकेसरी“: १८९७ च्या सारगढी च्या युद्धावर आधारलेला हा चित्रपट आहे, आणि अक्षय  ची भूमिका आहे  “हवालदार ईश्वरसिंह“.

लक्षात राहील अशी ही भूमिका असणार आहे. ह्या चित्रपटाची नायिका असणार आहेपरिणीती चोप्रा.’ मार्च महिन्यात हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे . तयारीत राहा.

  • दुसरा आहेमिशन मंगल‘: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय सेनेने पहिली कामगिरी फत्ते केली ती होतीमिशन मंगल” . ह्या चित्रपटात अक्षय बरोबर दिसणार आहेत, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, आणि शर्मन जोशी. १५ ऑगस्टला हा रिलीज होणार .बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे. सोडू नका.
  • तिसरा आहेगुड न्यूज“:  कशाची आहे ही गुड न्यूज हे पडद्यावर बघायला मजा येणार आहे. कारण ह्या गुड न्यूज साठी  अक्षय ला काय काय उलथापालथ करावी लागली त्याची धमाल बघायची आहे. करीना कपूर अक्षय बरोबर असणार आहे. धमाल बघा धमाल.
  • चौथा चित्रपट म्हणजेहाऊसफुल‘: ऑक्टोबर मध्ये बघायचाय. ह्यात पूजा हेगडे, क्रीती सेनन, कीर्ती खरबंदा, राणा दगगुबाती, बॉबी देओल, आणि रितेश देशमुख एवढे कलाकार अक्षय बरोबर काय काय करणार आहेत हे बघाच.
  • आणि पाचवा आहे एक अफलातून सिनेमा, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो म्हणजे  “”सूर्यवंशी“”.   अक्षय आहे एका भन्नाट  पोलीस ऑफिसर च्या रोल मध्ये, आणि हा चित्रपट आहेरोहित शेट्टी चा. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की ह्या चित्रपटात काय, काय, काय, काय, काय काय, असणार. कॉलेजमध्ये असाल तर दांडी मारून, ऑफिस मध्ये रजा काढून, दुकानात असाल तर दुकान बंद करून, दौऱ्यावर असाल तर अर्धवट सोडून, यायची तयारी ठेवा ह्या अक्षय कुमारच्या  मेजवानीला. कारण तुम्ही अक्षय कुमारचे फॅन आहात नामग एवढंच तर करायचंय…..
सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author