अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र

अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली का? असे विचारले सुद्धा. अखेर या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या पोस्टर मधून मिळाले असून अखेर नचिकेत प्रधान म्हणजेच अमेयला त्याची अलिशा मिळाल्याचे दिसते आणि अलिशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार असल्याचेही या पोस्टरमधून स्पष्ट झाले आहे.

 

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि सई पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी आजच्या टेक्नोसॅव्ही जगातील एका मुलाची कथा मांडली आहे. या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केली असून त्याने नचिकेताच्या व्यक्तिरेखाठी तब्बल ८ किलो वजन वाढवले होते, तसेच त्याचा वेगळा लुक या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर सई ताम्हणकर हिचाही एक हटके अंदाज या पोस्टर मध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय केलेल्या नचिकेताला त्याची अलिशा कशी? कुठे? आणि कधी मिळाली? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. चित्रपटाला हृषीकेश, सौरभ, जसराज यांचे संगीत लाभले असून क्षितीज पटवर्धन यांची गीते आहेत. अमेय आणि सई अशी हटके जोडी असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

Review

0%

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा...
0%

About The Author