ओळखा बघू ह्या तरुण असून म्हाताऱ्या असलेल्या आजोबांना.. कोण आहे हा अभिनेता..??

ओळखा बघू ह्या तरुण असून म्हाताऱ्या असलेल्या आजोबांना.. कोण आहे हा अभिनेता..??

सारांश सिनेमा आठवतोय का..? अनुपम खेरच्या पदार्पणातला त्यांच्या उत्तय अभिनयाने सजलेला सारांश हा सगळ्यांनाच आवडलेला चित्रपट. त्याची खासियत अशी की अनुपम खेर ह्यांनी ऐन तारुण्यात म्हाताऱ्या व्यक्तीची केलेली व्यक्तिरेखा. अवघडच काम आहे नाही का..? पण पुढे जे यश अनुपम खेर ह्यांच्या वाटेला आलं ते आपण पाहतोच आहोत. आता आपल्या मराठमोळ्या अभिनेत्याला देखील हीच संधी मिळाली आहे. तोही सध्या आपल्या अभिनयामुळे प्रत्येक सिनेमा सीरिअल मधून चाहत्यांना चकित करतच आहे. पण आता त्याला इतक्या कमी वयात प्रौढ व्यक्तिरेखा करायला मिळणार आहे. कोण असेल बरे हा तरुण वृद्ध..??

 

READ ALSO :  मराठी ताऱ्यांचे ‘कृष्णधवल’ फोटोशूट…!

टॉक करत आपला फास्टर फेणे आता सज्ज झाला आहे संगीत संशयकल्लोळ ह्या नाटकातून रसिकांची मने जिंकायला.. ह्या आधीही त्याने म्हणजेच अमेय वाघ ने हे नाटक केले होते आणि आता आठ वर्षांनी तो पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेतोय. ह्या नाटकात फाल्गुन रावांच्या भूमिकेत तो रंगभूमी गाजवायच्या तयारीत आहे. ह्या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. मेक अप साठी कित्येक तास घालवावे लागत असले तरी तो मेक अप परफेक्ट झाला पाहिजे ह्याकडे तो लक्ष देतो. आणि मेक झाल्यावर फाल्गुनराव हा अमेय वाघ आहे हे ओळखुही येत नाही. ते फोटो त्याने इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत.

त्याच्या मेकअप चे व्हिडीओ पाहिल्यावर मेकअप कलेचा अंदाज येतो. ह्या नाटकात मजेशीर भूमिका असली तरी हरहुन्नरी कलाकार असलेला अमेय त्याही भूमिकेला योग्य न्याय देतो. नाटकाचे काही व्हिडीओ यु ट्यूब वर आहेत ते पाहता म्हाताऱ्या माणसाची भूमिका आणि त्याला लागणारा आवाज ह्यावर अमेयची मेहनत दिसते. ह्या पूर्वीही त्याने त्याच्या उत्तम अभिनयाची चुणूक सिनेमा, सीरिअल, नाटक आणि वेब सिरीज मधून दाखवलीच आहे. संगीत संशयकल्लोळ बरोबर थ्रिलर वेबसिरीज मधूनही अमेय झळकणार आहे. ह्या वेबसिरीजच्या नाव आहे ‘असुरा’..!! आणि ह्या वेब सिरीज मध्ये हर्षद वारसी बरोबर त्याची अभिनयाची जुगलबंदी असेल. ह्यात काम करायला अमेय अत्यंत उत्सुक आहे. त्याच्या नाटकासाठी आणि आगामी वेब सिरीज साठी अमेय वाघ ला फिल्मी भोंगा तर्फे खूप शुभेच्छा..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author