महानायक “अमिताभ बच्चन” आणि एस. टी. बस मधून प्रवास? कधी शक्य आहे का..??. पण शूटिंग करताना वाट्टेल ते.

बहुतेक आज मोठे आणि दिग्गज म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूड कलाकार खूप मोठं स्ट्रगल करूनच मोठे झालेत असा त्यांचा इतिहास सांगतो. कोणी टेम्पररी नोकरी करत, होता, तर कोणी महिलांची कुंडांची कानातली आभूषणं रस्त्यावर उभा राहून विकत होता, तर कोणी हॉटेल मध्ये नोकरी करत होता, तर कोणी क्लार्कची नोकरी करत होता, असे अनेक किस्से आपण मोठ्या कलाकारांच्या बाबतीत ऐकले आहेत. त्यावेळी सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती गंभीर होती, कोणी नशीब अजमावायला मुंबईत आला आणि मुंबईकर झाला, कोणाच्या खिशात ३०रुपये होते आणि तो घर सोडून आला, तर कोणी १०० रुपये घेऊन मुंबईत हीरो बनायला आला. कोणाला स्वप्नात सुद्धा हीरो बनू असं वाटलं नव्हतं, तर कोणी खूप वर्ष दुसऱ्याच्या हाताखाली काम करून मोठे झाले. कोणी पायी पायी स्टुडिओत यायचे, तर कोणी बसने, तर कोणी धक्के खात ट्रेन पकडून यायचे. असे खडतर प्रसंग बहुतेक बॉलिवूड हिरोंवर आलेत.

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

बॉलिवूड चा महानायक “अमिताभ बच्चन” ह्यांना सुद्धा असल्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं, त्यांनी सुद्धा बसने प्रवास केलाय, लोकलचा प्रवास अनुभवलाय. पण सुपर स्टार झाल्यावर ह्या प्रत्येक हिरोच्या आयुष्यात सुबत्ता आली, आणि करोडो रुपयांचे धनी झाले. मग कशाला बस अन ट्रेन चा प्रवास करतील? मोठं झाल्यावर ऐशो आरामाची जिंदगी. कामं पण सगळी चांगलीच करायला मिळतात त्यांना. हीरो कधी घरात झाडू मारत नाही किंवा कपडे धूत नाही. पण “अमिताभ बच्चन” वर आत्ता नुकतीच एस.टी. बस मधून प्रवास करायची वेळ आली, नंतर एका बैल गाडीतून गचके खात प्रवास करायची वेळ आली , आणि ज्या बाजेवर कधी बसले नसतील ती बाज समोर दिसल्यावर त्या बाजेवर अंग टाकून विश्रांती घ्यायची वेळ आली, काय वाटलं असेल ह्या महा नायकाला ?

नाही म्हणजे, गरिबी आली म्हणून नाही होss.

शूटिंग करताना त्यांच्या भूमिकेत तसा प्रसंग रंगवायचा होता म्हणून हे सगळं त्यांना करावं लागलं. ‘अमिताभ बच्चन’ म्हणजे बॉलिवूड चा एक नंबरचा कलाकार म्हणून प्रसिद्ध, मग त्यांचा रुबाब तर सगळ्यात भारी असणार ना. फालतू कामं ते कशी करणार? पण तसं नाहीये. एक नंबरचा कलाकार असून सुद्धा साधा आणि नम्र आहे म्हणून आज लोकांचा सगळ्यात आवडता आणि आदरणीय कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या मराठी निर्माता दिग्दर्शक ‘नागराज मंजुळे’ ह्यांच्या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन एक महत्वाची भूमिका करत आहेत. त्या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे, आणि नागराज मंजुळे म्हणजे वास्तव दाखवणारे निर्माते दिग्दर्शक, त्यामुळे बैलगाडी, एस.टी. ची बस, किंवा खाट म्हणजेच बाज, ह्या गोष्टी त्यांच्या सिनेमात असणं हे आपल्याला काही वेगळं नाही. पण अमिताभ बच्चन ह्या गोष्टींशी आता संपर्कातच नाहीत. आणि त्यांनी आजपर्यंत ज्या चित्रपटात कामं केलीत त्या चित्रपटात कधीही ह्या गोष्टी आल्याच नाहीत म्हणून हे सगळं जरा वेगळं वाटतंय. पण ह्या एक नंबरच्या सुपर हीरोनं बैलगाडीत बसायचं टाळलं नाही, किंवा बाजेवर झोपायला नकार दिला नाही . शूटिंग करताना वाट्टेल ते करायची तयारी असते ह्या कलाकाराची. म्हणून तर आज ह्या वयातही ह्या कलाकाराची बरोबरी कोणी करू शकलं नाही. नागराज मंजुळेंचा “झुंड” नावाचा हिंदी चित्रपट येतोय लवकरच त्यातले सगळे हे प्रसंग अमिताभ बच्चन यांनी अनुभवले, आणि सामान्य जीवन कसं असतं ह्याचा अनुभव ह्या शूटिंगच्या दरम्यान घेता आला. हा अनुभव घेत असताना त्यांना त्यांच्या स्ट्रगल काळातली बसच्या प्रवासाची आठवण झाली ती त्यांनी बोलूनही दाखवली. आता आपण थोडी वाट पाहूया ह्या एका वेगळ्या चित्रपटाची. मराठी दिग्दर्शक आणि बॉलिवूड चा महानायक. कसा असेल हा चित्रपट ? पण बघायला मजा येणार आहे. खूप उत्सुकताही आहेच.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...