अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा तरुण निर्माता ‘बाबो’ या आगामी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत असून हा मल्टीस्टारर विनोदी चित्रपट ३१ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अमोलने विशेष मेहनत घेतली असून चित्रपटाच्या कथानकाची मागणी म्हणून अमोलने आपलं ७ किलो वजन केवळ एका महिन्याभरात घटवलं आहे.   
 
 
दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारे अमोल कागणे सध्या अभिनयातले खाचखळगे जाणून घेत आहेत. त्यासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी दाखवत अमोल ७० एमएमवर एक स्टायलिश हिरोच्या अंदाजात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच लॉन्च झालेलं ‘बाबो’ मधील ‘म्याड रं’ हे  गाणं तसंच टिझरमधून आपल्याला अमोल कागणे यांच्या अभिनयाची एक झलक पहायला मिळतेय. त्यांचा हा नवीन अंदाज पाहून ह्यामागील रहस्य विचारले असता, ”मला ‘बाबो’ चित्रपटाची ऑफर आली त्यानंतर एका महिन्याने चित्रीकरणाला सुरवात होणार होती. त्यामुळे माझ्याजवळ स्वतःकडे जरा अधिक लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ होता. प्रत्यक्षात दिसणारं व्यक्तिमत्व पडद्यावरही तितकंच आकर्षक दिसावं याकरिता मी प्रॉपर डाएट आणि वर्कआउट फॉलो केला त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मला आला, जो तुम्हीही पाहू शकता” असं निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल कागणे यांनी सांगितलं.  
 
 ‘म्याड रं’ या गाण्यातली अमोल कागणेंनी उडवून दिलेली धमाल सध्या सर्व म्युझिक चॅनेल्सवर पहायला मिळतेय.  मराठी मनोरंजक्षेत्राला अमोल कागणेंच्या रूपानं एक प्रॉमिसिंग चेहरा नक्कीच भेटणार यात काही शंका नाही.  
‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author