हा कलाकार ठरला “मराठी विश्वभूषण पुरस्काराचा मानकरी.

हा कलाकार ठरला “मराठी विश्वभूषण पुरस्काराचा मानकरी. बघा काय आहे त्यांची मोलाची कामगिरी.

अनेक नाटकं, अनेक चित्रपट आपण पाहतो. भूमिका करणारे कलावंत त्या त्या पत्रात शिरून ती भूमिका वठवतात तेंव्हा  प्रेक्षकांना दाद द्यायलाच लागते.  दाद वेगवेगळ्या प्रकारांनी देतात प्रेक्षक, टाळ्यांचा कडकडाट, प्रत्यक्ष भेटून स्तुती, पुन्हा पुन्हा तोच प्रयोग किंवा चित्रपट बघून, पण दाद ही मिळतेच. प्रेक्षक एखाद्या पात्रावर प्रेम करायला लगतात. त्या पात्राच्या बाबतीत काही वाईट घडलं तर प्रेक्षकांना सुध्दा खूप वाईट वाटतं. इतकंच काय पण आवडणाऱ्या पात्राशी कोणी वाईट वागलं तर प्रेक्षकांना सुद्धा ते आवडत नाही. हे असं बऱ्याचवेळा टी व्ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या बाबतीत घडतं. अशीच सध्या टी व्ही वर  गाजत असलेली एक नावाजलेली मालिका म्हणजे, “”स्वराज्य रक्षक संभाजी””. 

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

“छत्रपती शिवाजी महाराज” म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा महाराष्ट्र जाणतो, तेवढा संभाजी महाराजांचा इतिहास लोकांना संपूर्ण माहिती नाही, कारण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. म्हणून तो इतिहास लोकांना माहिती व्हावा म्हणून “स्वराज्य रक्षक संभाजी” ह्या मालिकेची निर्मिती झाली. ऐतिहासिक, मालिका, किंवा चित्रपट म्हणजे अवाढव्य सेट, त्यातले वैभव दाखवणारे महाल, खूप मोठे सैन्य, त्यांची शस्त्रास्त्र,  भरजरी कपडे , दागदागिने, नोकर चाकर, लढाईचे मोठमोठे देखावे. ह्या सगळ्या गोष्टींची जमवाजमव.  जास्त खर्चाचे काम. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ह्यात काम करणारे कलाकार सुद्धा त्या त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला शोभतील, दिसतील असे असले पाहिजेत, तरच ती मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.  ही मालिका करताना ह्या सगळ्या गोष्टींकडे  लक्ष दिले गेले आहे म्हणून आज ही मालिका खूप गाजते आहे.  ह्या मालिकेची निर्मिती स्वतः डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. कारण  ‘अमोल कोल्हे ‘  हा माणूस जणू काही ‘छत्रपती शिवाजी महाराज’ किंवा ‘संभाजी महाराज’ ह्यांच्या हुबेहूब भूमिका साकारण्यासाठीच जन्माला आला असेच म्हणावे लागेल. ह्या दोन्ही भूमिकांना साजेसा चेहेरा , अंगकाठी, बोलण्याची लकब, ह्या गोष्टी अगदी तंतोतंत जुळतात आणि आजपर्यंत लोकांनी त्यांच्या भूमिकांना  चांगलीच पसंती दिली आहे.  संभाजी महाराज ही भूमिका ते अक्षरशः जगतायत. अगदी मनापासून. म्हणून ही मालिका प्रचंड गाजते आहे.  ही मालिका लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं घर विकून पैशांची उभारणी केली आहे ही मोठी आणि कौतुकाची बाब आहे.  

सगळ्याच बाबतीत उत्कृष्ट ठरलेली ही मालिका संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास लोकांसमोर आणते आहे , ही फार मोठी आणि मोलाची कामगिरी डॉ. अमोल कोल्हे करत आहेत , म्हणून नुकताच त्यांना “मराठी विश्वभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांचं नाव, मालिकेचं नाव आणखी मोठं झालं.  आणि त्यावर आणखी एक आनंद देणारी गोष्ट म्हणजे  छत्रपती उदयन राजे भोसले यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचं ह्या मालिकेच्या यशाबद्दल खूप कौतुक केलं , आणि ही मालिका संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास लोकांना समजण्यासाठी पुढेही चालु ठेवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि जोपर्यंत छत्रपती उदयन महाराज आहेत तो पर्यंत यापुढे मालिकेच्या खर्चासाठी तुम्हाला आता घराची एक वीट सुद्धा विकावी लागणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे आता डॉ. अमोल कोल्हे यांचा खडतर प्रवास संपेल अशी आशा व्यक्त करूया .  डॉ. अमोल कोल्हे ह्यांच्या धाडसाबद्दल, आणि मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या  सगळ्या टीमला सलाम , आणि  पुढची  कामगिरी फत्ते करण्यासाठी फिल्मीभोंगा मराठी तर्फे  शुभेच्छा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author