मराठमोळी अमृता आणि “सत्यमेव जयते “ या चित्रपटातील सरिता दोघींचा स्वभाव सारखा

मराठमोळी अमृता आणि “सत्यमेव जयते “ या चित्रपटातील सरिता दोघींचा स्वभाव सारखा

आपल्या विविधांगी अभिनयाच्या बळावर आजवर अमृताने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा यावर्षी चा प्रवास आपण बघू या.  अमृता हि एक अप्रतिम अभिनेत्री तर आहेच परंतु एक उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर तिने तिच्या अभिनयाचा ठसा हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा उमटवला आहे. येत्या स्वतंत्र दिनी प्रदर्शित होणार्या “सत्यमेव जयते “ या हिंदी चित्रपटाद्वारे ती आपल्यासमोर सरिताच्या भूमिकेत दिसणार आहे. पण एक खास बाब अशी आहे , या चित्रपटाबद्दल ती म्हणजे चित्रपटातील सरिता हि खर्या आयुष्यातील अमृतासारखी आहे.

२०१८ हे वर्ष अतिशय खास ठरलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरचा या वर्षातील प्रवास अमृताच्या उत्तम अभिनय, नटखट अदा आणि गोड हास्यामुळे अनेकांच्या स्मरणात एक ताजी आठवण म्हणून राहिला आहे आणि पुढेही राहिल. अमृता नेहमीच एकापेक्षा एक दमदार पात्र साकारुन प्रेक्षकांना सरप्राईज करत आहे. ज्याप्रमाणे कथेत नाविन्य असतं त्याचप्रमाणे अमृताने साकारलेल्या प्रत्येक पात्राची छटा ही जरा वेगळी असते आणि यानिमित्तानेच अमृताला विविध रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते.

मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात अमृताने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ आणि त्यानंतर ‘डॅमेज’ या वेब सिरीजमधील ‘लोव्हीना’ हे सिरीयल किलरचे पात्रं साकारले. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे. अमृतासाठी सरिताची भूमिका ही अगदी सोपी होती, यासाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाही. कारण ख-या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. जसे की आपली अमृता जशी खोडकर, मस्तीखोर, प्रेमळ तशीच सरिता देखील आहे. विशेष म्हणजे काय बरोबर, काय चूक याची योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे. या चित्रपटाच्या आणि पात्राच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मनोज बाजपेयी आणि मनमिळावू अमृता यांची पती-पत्नीची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author