आनंदीबाई जोशींना ‘सरस्वती’ पुरस्कार देऊन चित्रपट महोत्सवाला सुरुवात

आनंदीबाई जोशींना ‘सरस्वती’ पुरस्कार देऊन चित्रपट महोत्सवाला सुरुवात

आनंदीबाई जोशी यांना सरस्वती फाळके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘सरस्वती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन विभागातर्फे (DMCS) घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी हा पुरस्कार देण्यात आला. यासाठी आनंदी गोपाळ चित्रपटाची ‘टीम’ उपस्थित होती. हा पुरस्कार आनंदी गोपाळ चित्रपटाच्या टीमने स्वीकारला. या व्यासपीठावर आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारणारी भाग्यश्री मिलिंद ही अभिनेत्री उपस्थित होती. तसेच गोपाळराव जोशी यांची भूमिका साकार करणारे ललित प्रभाकर, तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस हे देखील उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्राध्यापक समर नखाते यांनी ‘आनंदी गोपाळ’ प्रेक्षकांना एक विशिष्ट काळाचं दर्शन देण्यात यशस्वी झाला असल्याचे सांगितले. तसेच विक्रम गोखले यांनीही दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या कामाचं कौतुक केले. या महोत्सवाचे हे यंदाचे आठवे वर्ष आहे. आज आणि उद्या असा दोन दिवस हा महोत्सव सुरू असेल. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे. यासाठी देशभरातून अनेक लघुचित्रपटकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुणेकरांनीसुद्धा या महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात पाहायला मिळाले.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author