अनिकेत विश्वासराव लवकरच अडकणार लग्नबेडीत

सर्व रसिकप्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला अनिकेत विश्वासराव लवकरच लग्नबेडीत अडकणार असून त्याचा साखरपुडा ५ ऑगस्ट रोजी स्नेहा चव्हाण हिच्यासोबत पुण्यात हिंजवडीत पार पडला.  अनिकेत हा ऍरेंज मरेज करत आहे. स्नेहा चव्हाण एक अभिनेत्री असून अनिकेत व तिच्या  साखरपुड्याची बातमी स्नेहाने तिच्या चाहत्यांना तिच्या इंस्टाग्रामवरून दिली. स्नेहा यापूर्वी “लाल इश्क़“ या चित्रपटात झळकली होती. स्नेहा आणि अनिकेतने नुकताच एक चित्रपट सोबत केला आहे तरीही त्यांचे हे ऍरेंज मरेजच आहे.

अनिकेत विश्वासराव कोणाबरोबर लग्नबेडीत अडकणार याबद्दल सर्वानाच खूप उत्सुकता होती. अनिकेतच्या इतर अनेक अफेअर्सबद्दल सर्वाना माहिती होती त्यावरून त्याची सहचारिणी नेमकी कोण असणार यावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. अखेर अनिकेतने त्याच्या जीवनातील त्याची सहचारणी शोधली आणि तीही पारंपारिक पद्धतीने

 

READ ALSO : पार्टी पुढे ढकलली

स्नेहाने नमूद केल्याप्रमाणे त्यांचा साखरपुडा हा पुण्यातील हिंजवडीत मोठ्या दिमाखात पार पडला. स्नेहा ही मुळची पुण्याची असल्याकारणाने हा समारंभ पुण्यात पार पडला. स्नेहा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. स्वप्नील जोशी अभिनित चित्रपट “लाल इश्क़ “ या चित्रपटात ती स्वप्नील जोशीबरोबर  झळकली होती. याआधी ती आणि अनिकेत नुसते एकमेकांना ओळखत होते. त्यांचे काही अफेअर वैगरे नव्हते. दोघांच्या घरी लग्नाबद्दल स्थळ शोधणे सुरु होते. स्नेहा व अनिकेत यांच्या एका नातेवाईकाकडून हा प्रस्ताव आला, त्यावर दोघांनी ठरवून हा निर्णय घेतला. आता लवकरच ते लग्न करणार आहेत. त्यांच्या पुढील चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याच्या प्रमोशनची सुरुवात होण्याआधीच ते लग्न करणार आहेत.

आपल्या सर्वांना त्या दोघांनी एकत्रित काम केलेल्या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असणारच. फिल्मीभोंगा त्याचेही अपडेट्स घेऊन लवकरच आपल्यासमोर घेऊन येणार आहे…

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author