अनिकेत विश्वासराव चढणार बोहल्यावर

 

पल्लवी सुभाष बरोबर ब्रेक अप नंतर अनिकेत विश्वासरावचा या अभिनेत्रीशी झाला होता साखरपुडा आणि आता बोहल्यावर चढणार.

पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव ह्यांची जोडी कित्येक वर्षे सगळ्यांना माहीत होती. पण त्यांचे नाते लग्नगाठीत रूपांतरित होण्या आधीच त्यांचे ब्रेक अप झाले. २०१७ मध्येच ते दोघे एकमेकांच्या संगनमताने विभक्तही झाले. ह्या ब्रेक अप मुळे अनिकेत विश्वासराव च्या चाहत्यांमध्ये मात्र निराश पसरली.

अनिकेत विश्वासराव हे नाव युवतीच्या तोंडावर खास असते. लोभस चेहरा आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर अनिकेतनी बऱ्याच सिरिअल्स आणि जाहिराती मिळवल्या आहेत. मराठी रंगभूमीवरही त्याने आपली अदाकारी सादर केली आहे.  मराठी चित्रपटातूनही तो झळकला आहे. पोस्टर बॉईज ह्या चित्रपटात त्याचे खास कौतुकही झाले आहे.

तसेच पल्लवी सुभाष बरोबर असलेल्या अफेअर मुळे देखील तो बरीच वर्षे चर्चेत राहिला आहे. पण तिच्या सोबत ब्रेक अप नंतर ते दोघे अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.  ब्रेक अप पासून अनिकेत एक ‘एलिजीबल बॅचलर’ म्हणून मिरवत असतानाच स्नेहा चव्हाण ह्या अभिनेत्रीने मात्र त्याला आपल्या प्रेमात पाडलेय.

 
 

READ ALSO : जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

कोण आहे ही स्नेहा चव्हाण?

स्वप्नील जोशी ह्या मराठीतल्या दिग्गज आणि अनुभवी अशा अभिनेत्या बरोबर  लाल इष्क ह्या चित्रपटातून पदार्पण करून स्नेहा चव्हाण ने आपली अभिनय क्षमता सगळ्यांना दाखवून दिली. पहिल्याच सिनेमात तिला इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

गम्मत अशी की अनिकेत आणि स्नेहा ह्या दोघांच्या आई ह्या मैत्रिणी असून त्यांनीच ह्या दोघांची भेट घडवून आणली. ह्या भेटीचे पुढे प्रेमात रुपांतरही झाले. आणि चॉकोलेट बॉय इमेज असलेला अनिकेत विश्वासराव आता एलिजीबल बॅचलर राहिला नाही.

काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपूडाही झाला आहे. साखरपुड्यानंतर लगेच त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले. आणि ती ‘मोस्ट अवेटेड’ लग्नघटिका दाराशी येऊन ठेपली सुद्धा. त्यांच्या हळदी समारंभाच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये त्यांचा उत्साह आणि प्रेम ओसंडून वाहत आहे. जसा साखरपुडा अगदीच मोजक्या नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थित पार पाडला गेला होता तशी हळदी मोजक्याच पै पाहुण्यात साजरी झालेली दिसते. पण त्याच्या उतू चाललेल्या आनंदात त्याचे चाहतेही नक्कीच खूप खुश झाले असणार. आणि त्यांच्या लग्नाच्या क्षणाकडे लक्ष्य ठेवून असणार हे नक्की.

लवकरच ते दोघे लग्नाच्याही बेडीत अडकतील. त्यांच्या लग्नसोहळ्याला कोणाकोणाला आमंत्रण दिली गेली आहेत आणि मराठी चित्रपटसृष्टीतले कोण कोण सितारे अवतरतील हे मात्र तेव्हाच कळेल.

पण ज्या प्रमाणे हिंदीतील लव्ह बर्डस आयुष्यभराच्या बंधनात अडकतायत त्या प्रमाणे तेच प्रेमाचे लोण आपल्या मराठी चित्रपटसृतीतही पसरू लागलंय हे नक्की. अनिकेत – स्नेहाच्या सुंदर फोटोंवरून

 त्यावर शिक्कामोर्तब ही होत आहे.

अशा ह्या प्रेमी युगुलाला मराठी फिल्मीभोंगा तर्फे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. नांदा सौख्य भरे..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author