कोण आहेत अनिकेत विश्वासराव याचे ‘गुरु’, ज्यांना अनिकेतने पत्र लिहिलंय !

कोण आहेत अनिकेत विश्वासराव याचे ‘गुरु’, ज्यांना अनिकेतने पत्र लिहिलंय !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंना वंदन करतो. तसंच अभिनेता अनिकेत विश्वासरावने ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंविषयीच्या भावना व्यक्त करून, त्याच्या गुरूंना नमन केलेलं आहे. कोण बरं आहेत अनिकेतचे हे गुरु ? तर

ज्यांना आपण ‘विनोदाचे सम्राट’ असं संबोधतो, ज्यांच्याशिवाय मराठी सिनेसृष्टी पूर्णच होऊ शकत नाही आणि ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना गेली पाच दशके कधी हसायला तर कधी रडायला लावले, असे जेष्ठ व श्रेष्ठ अभिनेते अशोक सराफ.

गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून अशोक सराफ यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त करताना अनिकेतने पत्रात खालील मजकूर लिहिला आहे…

प्रिय अशोकमामा,

आज गुरूपौर्णिमेचा दिवस. या सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्या अगोदरपासूनच तुम्हाला गुरूस्थानी मानणाऱ्या माझ्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अभिनय असो किंवा विनोदाची अचूक वेळ साधणं असो, तुम्ही दोन्हीमध्ये ‘बाप’ आहात. हे तुम्ही वेळोवेळी सर्वांना दाखवून दिलंय. नाटक, टीव्ही आणि सिनेविश्वामध्ये तुम्ही आपल्या दर्जेदार कलाकृतीने ठसा उमटविला आहे.

हे माझं भाग्य आहे की, माझा पहिला सिनेमा ‘लपून छपून’मध्ये मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. विनोदासाठी भाषेवर प्रभुत्त्व असणं किती गरजेचं आहे, हे तुम्ही शिकवलंत. विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली ‘वैचारिक बैठक’ खरंच आमच्या पिढीने तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे.

अनेक सिनेमांमधल्या तुमच्या भूमिकांना विनोदाची झालर असायची. पण प्रत्येक भूमिकेची लकब, संवादफेक आणि हावभाव यातल्या वैविध्यावर तुम्ही डोळसपणे काम केल्याने तुमच्या विनोदात एकसूरीपणा कधीच जाणवला नाही, हे आमच्यासारख्या आजच्या अभिनेत्यांना शिकण्यासारखं आहे.

तुमच्यावर नेहमीच रसिकांनी विनोदी अभिनेत्याचे शिक्कामोर्तब केले. पण ‘बहुरूपी’, ‘भुजंग’, ‘कळत-नकळत’,’ अरे संसार संसार’, ‘भस्म’ यांसारख्या सिनेमांमधून तुमच्या अभिनयाची एक वेगळी छटा पाहायला मिळाली.

मी तुम्हाला अभिनयातले आणि विनोदातले बादशाह मानतो. तुमची सर दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्याला येणे शक्य नाही. तुमच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने आपण एकत्र केलेल्या ‘आंधळी कोशींबीर’या दुसऱ्या सिनेमानंतर “तुझं कॉमिक टायमिंग चांगलं आहे”, ही मला दिलेली दाद कोणत्याही पुरस्कारापेक्षा मला जास्त आनंद देणारी होती.

गेली ५० वर्ष तुम्ही सातत्याने काम करत आहात, जेव्हा कधी मला काम करताना थकायला होतं, तेव्हा मी स्वत:ला तुम्हाला आठवतो. तुमची काम करण्याची ऊर्जा आणि सातत्य हे माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे.

तस्मै श्री गुरवे नमः।

अशाप्रकारे अनिकेतने अशोक सराफ यांच्याबद्दल आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.

अशोक सराफ हे सर्वांसाठीच प्रेरणादायक आहेत. वयाची सत्तरी उलटली तरी त्यांच्यातील ऊर्जा हि एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. फसव्या आधुनिकेतेकडे झुकणारी आजची तरुण पिढी भारतीय संस्कृतीची मूल्य विसरत चाललेली आहे. अशात अनिकेतचं अशोक सराफ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं इतर तरुणांना आपल्या संस्कृतीतील चांगल्या मूल्यांचं पालन आणि आदर करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल, अशी आशा वाटते.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती-जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author