आणखी एक ग्रामीण प्रेम कथा, वंटास!

मराठी चित्रपटसृष्टी ही वेगाने फोफावत असून त्यात वेगवेगळया विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होताना दिसून येते. मराठीत याआधीही अनेक विविध विषयांवर भाष्य करणारे कथा सांगणारे चित्रपट आले आहेत. त्यात  चेकमेट, नटरंग, सैराट, मुंबई-पुणे-मुंबई अशा अनेक चित्रपटांचा सहभाग आहे.सैराट या चित्रपटात ग्रामीण भागातील एक प्रेमकथा दाखवण्यात आली होती. नागराज मंजुळे यांच्या सैराटफँड्री या चित्रपटांनंतर ग्रामीण भागातील विविध विषयांवर समस्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट येऊ लागले. अशा प्रकारे ग्रामीण विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये २०१८ साली प्रदर्शित झालेल्या यंटम आणि बबन या चित्रपटांचा समावेश आहे. दिग्दर्शक ज्ञानेश्वर यादवराव उमक यांचा वंटास हा चित्रपट देखील ग्रामीण भागातील एक कथा आपल्या समोर मांडतो

दिग्दर्शक ज्ञानेश्वर यादवराव उमक यांचे दिग्दर्शन लाभलेला वंटास हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट ग्रामीण कथेवर भाष्य करणारा असला तरीही या विषयांवर आधी आलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा वेगळी आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून चित्रपटाचा ट्रेलर बघितल्या नंतर नोंदवण्यात आली आहे. वंटास या चित्रपटातुन आपल्याला सगळेच नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.अजय वरपे, स्नेहल साळुंखे, अक्षय माहुलकर, रमेश वेदपाठक असे नवोदित कलाकार वंटास मधून आपल्या भेटीला येत आहेत.

वंटासचित्रपटाची कथा

वंटास या चित्रपटातील तरुणाला (अजय वरपे) लहानपणा पासून एक मुलगी (स्नेहल साळुंखे)आवडत असते. दोघेही मोठे झाले परंतु त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या भावना मात्र त्याच होत्या. त्या मुलीचे मात्र वेगळ्याच तरुणावर प्रेम होते . ही गोष्ट जाणून घेण्यासाठी तो तरुण(अजय वरपे) ज्याचे  त्या तरुणीवर प्रेम असते तो तिला या प्रेमाबद्दल कबुली द्यायचे ठरवतो. आणि तेव्हा ती त्याला ती ज्या तरुणावर प्रेम करते त्याबद्दल सांगते. अशाप्रकारे काहीशी गुंतागुंत असलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटतो आहे.

वंटासट्रेलर

नवोदित कलाकार आणि सगळयात महत्वाचे म्हणजे वेगळे कथानक यामुळे वंटास या चित्रपटाच्या ट्रेलर ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर मध्ये अनेक गमतीशीर दृश्यांची झलक दाखवण्यात आली आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या वेलकम या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेचे दिलेले उदाहरण हे चित्रपटाच्या ट्रेलर मधील सगळ्यात उत्कृष्ट  दृश्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रियासुद्धा प्रेक्षकांकडून नोंदवण्यात आली आहे.वंटास हा चित्रपट प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन करणार नाही तर त्यांच्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवेल असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.