बॉलिवूडला लागला मराठीचा ध्यास. आता अनु मलिक ही वळतोय मराठी सिनेमा कडे..

बॉलिवूडला लागला मराठीचा ध्यास. आता अनु मलिक ही वळतोय मराठी सिनेमा कडे..

‘टन टना टन टन टन टारा, चलती है क्या नौ से बारा?” म्हणत वरूण धवनने काही दिवसांपूर्वी चांगलाच गोंधळ घातला होता. हल्ली ‘जुन्या सिनेमांची गाणी उचलून त्याला रिमिक्स करून नवीन हिरोच्या सिनेमात वापरायचं’ अशी सरमिसळ जोरात चालू आहे. पण ह्या गाण्याला काहीही धक्का न लावता डेव्हिड धवनने आपल्या मुलाच्या सिनेमात वापरलं. हे ओरिजिनल गाणं कोणाचं आहे हे सांगायची गरज पडतच नाही. कारण आपल्या खास शैलीत संगीतबध्द केलेल्या ह्या गाण्याने नव्वदीच्या दशकातही धुमाकूळ घातला होता. अनु मलिक यांची अशी भरपूर गाणी अफाट प्रसिद्ध आहेत. अलिशा चिनॉय ह्या गायिकेबरोबर सुरुवातीला बरीच गाणी अनु मलिक ह्यांनी केली. तीही सगळी सुपरहिट. त्या नंतर कित्येक गायक – गायिकांसोबत अनु मलिक ची गट्टी आणि भट्टी जोरदार जमली. बॉर्डर, विरासत, रेफ्युजी सारख्या सिनेमातील सुमधुर सांगीत असो किंव जुडवा, मै हू ना, बादशाह सारखी उडती गाणी असोत अनु मलिक ची वेगळी छाप ह्या गाण्यांवर दिसून येते.

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

मराठी चित्रपट आणि मराठी संगीत ह्याची आवड असल्याने अनु मलिक आता हया सृष्टी कडे वळतोय. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले ह्यांना दैवत मानणाऱ्या अनु मलिक ला आता मराठी चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमवायचे आहे. सध्या हिंदी चित्रपटातील त्यांचे काम पूर्वी इतके नसल्याने सुद्धा कदाचित त्यांनी इतर भाषिक चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला असावा. आठ फेब्रुवारी ला प्रदर्शित होत असलेल्या ‘आसूड’ ह्या चित्रपटाद्वारे अनु मलिक मराठी रसिकांपुढे आपले सुरेल संगीत घेऊन येणार आहेत.

आसूड ह्या चित्रपटाची कथा काहीशी वेगळी आहे. त्यामुळे त्याला काहीश्या धीर गंभीर संगीताची गरज असणारच. समाजव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाच्या विषयाची हाताळणी हा सिनेमा करत असल्याने त्यातील गाणी आणि संगीत कसे लोकांना आकर्षित करेल हे पाहणे गरजेचे होते. आणि इतक्या वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी संगीतकार ह्या चित्रपटाला लाभले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारासहित, फिल्मफेअर आणि अनेक बक्षिसे मिळवलेल्या अनु मालिकना सुद्धा मराठी चित्रपट क्षेत्रांत नामी संधी मिळाली आहे. ह्या चित्रपटाद्वारे मराठीत आगमन करताना अनु मलिक म्हणतात की, “मला एक प्रकारे नवीन संधी मिळलाली आहे. सुंदर विषयावरील चित्रपटाला संगीत देने हा एक सन्मान ही आहे. आता ह्या पुढे मराठी चित्रपटसृष्ठीत अजून संधी मिळतील ह्याची मला खात्री आहे.” ह्याचाच अर्थ असा की अनु मलिक आता दुसरी इनिंग खेळायला सज्ज झाले आहेत. मराठी सिनेमांना आणि रसिकांना देखील त्यांच्या सुरेल संगीताची जादू अनुभवायला मिळेल ह्यात शंका नाही. फिल्मी भोंगा तर्फे अनु मलिक ह्यांच्या ह्या नवीन व्हेंचर ला खूप खूप शुभेच्छा..!!

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author