काय आहे मनमोहनाच्या या राधिकेचं गुपित : आशा काळे

काय आहे मनमोहनाच्या या राधिकेचं गुपित : आशा काळे

अप्रतिम सौंदर्य व अंगभूत अभिनयकौशल्य अंगी असलेल्या जेष्ठ अभिनेत्री आशा काळे. त्यांनी अगदी लहानवयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अप्रतिम कथ्थक नृत्यांगना अशी त्यांची ख्याती होती. सालस, सोज्वळ, सहनशील, गृहिणी, अर्धांगिनी, प्रेयसी, माता, सुन, आई, बहीण अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्यांचं अप्रतिम, लाघवी सौंदर्य त्यांचा विशिष्ट प्रकारच्या साडीच्या पेहेरावामुळे अगदी खुलवून टाकत असे. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची कारकीर्द बऱ्याच वर्षांची आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीप्रधान चित्रपटांची सुरुवात आशा काळें यांनीच केली.  त्यांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा अत्यंत सशक्त महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. त्यांच्या भूमिकांमुळे समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलू लागला. त्यांच्या मराठी चित्रपट कारकिर्दीतील चित्रपटांचा आढावा घेतला तर हे लक्षात येईल त्यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका ह्या अगदी वैविध्यपूर्ण होत्या. पण तरीही त्यांनी त्या प्रत्येक भूमिकेला योग्य असा न्याय दिला.

 

READ ALSO : कल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…

आशा काळे यांच्या मराठी चित्रपटातील अभिनयाची कारकीर्द तांबडी माती या चित्रपटाने सुरू झाली. त्यांनी एकापेक्षा एक असे उत्तम चित्रपट दिले. त्यांचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले व त्यांनी प्रेक्षकांच्या विशेषतः स्त्रिप्रेक्षकांच्या मनावर बराच काळ अधिराज्य केले. त्यांच्या मराठी चित्रपट कारकिर्दीतील सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे ‘बाळा गाऊ कशी अंगाई’. या चित्रपटाने त्याकाळात विक्रम घडविला होता. त्या चित्रपटातील सुरेल गाणी अजुनही प्रेक्षकांच्या ओठावर रुंजी घालत असतात. त्या चित्रपटातील अंगाई गाऊन आजही आई आपल्या तान्हुल्याला जोजावते. ‘निंबोळीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही’

ना आज त्यांचा वाढदिवस आहे की त्यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे तरीही आज त्यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे मराठी रंगभूमीचे एक पर्व  रुपेरी पडद्यावर साकारणार आहे ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. आशा काळे यांनी जेष्ठ दिवंगत अभिनेते ज्यांना मराठी रंगभूमीचा सुपरस्टार असे संबोधले जाते त्या डॉ काशिनाथ घाणेकर यांच्याबरोबर प्रमुख भूमिका असलेला ‘हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटात अभिनय केला होता. त्यांतील त्यांचे युगुलगीत खूप लोकप्रिय झाले होते. ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय’ त्यांच्या आठवणीला या गाण्यामुळे पुन्हा एकदा उजाळा मिळाला. तर मग पुन्हा एकदा ताल धरून प्रेयसीला किंवा प्रियकराला मागणी घालण्यास सज्ज होऊया.

चला बघुया ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author