‘अष्टवक्र’ सामाजिक भान जागं करणारा चित्रपट

आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत, त्यांच्या समस्या आहेत ज्यांना आपण पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे. जसे जेलमध्ये बंद असलेले गुन्हेगार आणि रस्त्यावर भीख मागणारी किंवा बालमजूर म्हणून काम करणारी मुलं. अशा दुर्लक्षित असलेल्या समाजातील घटकांवर प्रकाशझोत टाकायला ८ जून २०१८ रोजी एक चित्रपट येतोय, ज्याचं नाव आहे ‘अष्टवक्र’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलेला आहे.

‘अष्टवक्र’ याचा अर्थ आहे आठ ठिकाणी वाकडा असेलला. त्याचीही एक वेगळीच कथा आहे. सतयुगात कहोड नावाचे वेदांचा गाढा अभ्यास असलेले एक ऋषी होते. एके दिवशी ते वेद पठन करत असताना त्यांना आवाज आला कि “बाबा तुम्ही चुकीचं पठन करत आहात” कहोड ऋषींनी पाहिलं तर त्यांच्या पत्नीच्या गर्भातून आवाज येत होता… जन्माआधीच बापाला चूक म्हणणाऱ्या मुलाचा त्यांना खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी गर्भातल्या मुलाला, “तू आठ ठिकाणी वाकडा होऊन जन्मशील” असा श्राप दिला आणि खरंच ते मुल आठ ठिकाणी वाकडं जन्मलं आणि पुढे जाऊन आपल्या बुद्धीच्या जोरावर हे मुल ‘अष्टवक्र ऋषी’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

          शारीरिक व्यंगावर मात करून एखादा अपंग व्यक्ती ‘अष्टवक्र ऋषी’ होऊ शकतो किंवा एखादा ‘स्टिफन हॉकींग’ सारखा महान शास्त्रज्ञ… पण मेंदूतल्या व्यंगाचे काय ?? एखाद्या गुन्हेगाराविषयी आपल्याला विचारले असता आपल्या मनात पहिल्यांदा काय विचार येतात ??? कि, “तो वाईट व्यक्ति आहे म्हणूनच त्याने हे कृत्य केलं..” “त्याला याची शिक्षा मिळायलाच हवी होती.” “तो समाजात राहायच्या लायकीचाच नाहीये..” वगैरे वगैरे” म्हणूनच गुन्हेगारांना समाजातल्या मुख्य प्रवाहातून काढून त्यांच्यासाठी बनलेल्या एका गलिच्छ अशा जगात ढकलून दिलं जातं. पण त्या गुन्हेगाराच्या असं करण्यामागे काही कारण आहेत.. तो जन्मताच गुन्हेगार न्हवता याचा कोणीही विचार करत नाही. याच बाबी ‘अष्टवक्र’ या चित्रपटात अधोरेखित करून दाखविण्यात आलेल्या आहेत.

या चित्रपटाची नायिका ‘अरुंधती’ खोटं बोलून गुन्ह्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकते परंतु ती तसं न करता आपल्या हातून चुकून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जाणं पसंत करते. तिथे गेल्यावर एका वेगळ्याच जगाची ओळख तिला होते.. तिथल्या समस्या तिथले संघर्ष याच्याशी तिचा जवळून संबंध येतो. अरुंधती गरोदर असते… आता तिला जे मुल होईल त्याचं काय ?? त्याची कोणतीही चूक नसताना त्याला अनाथासारखं जगावं लागणार का?? कसल्या वातावरणात ते मुल वाढेल ? त्या मुलाला हे शापित आयुष्य समाजाने का द्यावं? असे अनेक प्रश्न अरुंधतीसमोर असतात.

अशा प्रकारचं जबरदस्त कथानक आणि आशय असलेला हा सिनेमा ८ जून २०१८ पासून जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे. वरुणराज फिल्मसचे वरुणराज साळुंखे यांनी ‘अष्टवक्र’ चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन हे प्रदीप साळुंखे याचं आहे. या चित्रपटात मयुरी मांडलिक, मंगेश गिरी आणि विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. चित्रपटातील संवाद अतिशय चांगले असून यातील संगीत हि उत्तम आहे.

मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.