अथर्व बेडेकर ला सर्वोत्कृष्ठ बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर

6 मे 2011 रोजी ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2018’ हा सोहळा पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या सगळ्या पुरस्कारांच्या यादीत एक नाव लक्ष वेधून घेत होतं ते म्हणजे अथर्व बेडेकर याचं… गेल्या वर्षी आलेल्या ‘अंड्याचा फंडा’ या चित्रपटासाठी अथर्व बेडेकरला ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१८’ चा सर्वोत्कृष्ठ बालकलाकाराचा पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आलं. हा चित्रपट संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला आहे. संतोष शेट्टी सर्वात जलद काम करण्यासाठी सिनेसृष्ठीत प्रसिद्ध आहेत. या चित्रपटात अथर्व व्यतिरिक्त शुभम परब आणि मृणाल रविंद्र जाधव या २ बालकलाकारांनी हि काम केलेलं आहे. या चित्रपटाची कथा संतोष शेट्टी यांची असून, पटकथा-संवाद, अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांचे आहेत.

‘डब्बा गुल’ या झी मराठीवरील कार्यक्रमाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखविणाऱ्या अथर्व बेडेकर याचा चित्रपट सृष्टीतला प्रवास वाखाणण्याजोगा आहे. २०१३ मध्ये माय डियर यश, असा मी अशी ती आणि २०१७ मध्ये ‘अंड्याचा फंडा’.

‘अंड्याचा फंडा’ हि २ जिवलग मित्रांची गोष्ट असून त्यात अथर्व ने ‘अंड्या’ची भूमिका साकारलेली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला खूप वेगवेगळ्या छटा आहेत… मित्रासोबत हसणारा-खेळणारा, आपल्या करामतींनी घरच्यांची त्रेधा-तिरपीट उडवणारा, तरीही मोठ्यांनी दिलेले संस्कार जपणारा, गोष्टींची उकल करायला आवडणारा, साहसी आणि मुख्य म्हणजे मित्रावर जीव ओवाळून टाकणारा असा हा ‘अंड्या’, अथर्व बेडेकरने उत्तम साकारलेला आहे.

दिग्दर्शक संतोष शेट्टीच्या मते, “अथर्वसोबत काम करणं त्यांना खूप सोपं गेलं कारण अथर्वची भाषा साफ आहे. त्याला इतर चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव असल्यामुळे त्याला एखादी तांत्रिक गोष्ट सांगितली की ती त्याला पटकन समजायची.” अंड्याच्या व्यक्तिरेखेसाठी लागणारा निरागसपणा आणि सहज-सुंदर अभिनय करण्याची क्षमता अथर्वमध्ये दिसल्यामुळेच त्यांनी अथर्वला या भूमिकेसाठी निवडल्याच त्यांनी सांगितलं.

‘सर्वोत्कृष्ठ बालकलाकार’ या पुरस्काराच्या शर्यतीत अथर्व बेडेकर सोबत होते, प्रतिक लाड (कॉपी), यश कुलकर्णी (घाट), श्रद्धा सावंत (कॉपी) आणि वैष्णवी तांगडे (क्षितीज). इतक्या सशक्त अभिनय क्षमता असलेल्या बालकलाकारांमधून अथर्वची निवड होणं खरंच कौतुकास्पद आहे.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.