स्वप्नमय कलाकृती देणारी अप्रतिम दिग्दर्शिका

स्वप्नमय कलाकृती देणारी अप्रतिम दिग्दर्शिका

मराठी चित्रपटसृष्टीत आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून अनेक स्त्री दिग्दर्शिकासुद्धा पुढे आल्या आहेत. दादासाहेब फाळके यांनी जेव्हा चित्रपटनिर्मितीची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी चित्रपटनिर्मितीची कला त्यांच्या पत्नीससुद्धा शिकवली होती. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत पुरुषांबरोबर स्त्रियांनीदेखील काम करावे अशी त्यांची इच्छा होती. हि त्यांची इच्छा कालांतराने पूर्ण झाली ज्यावेळी स्त्रियांनी चित्रपट निर्मितीक्षेत्रात पावूल ठेवले. आज आपण अशाच एका स्त्री दिग्दर्शिकेविषयी जाणून घेणार आहोत. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात नावारुपाला आल्यानंतर ज्यांनी मराठी चित्रपट दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या पार पाडली. स्वप्ना वाघमारे जोशी हे नाव टीव्ही हिंदी आणि मराठी मालिका विश्वात खूप प्रसिद्ध आहे.

 

READ ALSO : ‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

स्वप्ना यांनी दमादम या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूप कमी यश मिळवले. त्याची काही इतकी चर्चा झाली नाही पण त्यानंतर आलेला ‘मितवा’ हा चित्रपट खूप गाजला. त्या चित्रपटाने स्वप्ना वाघमारे जोशी यांचे नाव यशाच्या शिखरावर नेवून पोहचवले. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार होते स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, सोनाली कुलकर्णी. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर त्या घेऊन आल्या फुगे हा मराठी चित्रपट. या चित्रपटाचे कथानक थोडे हटके होते. हा चित्रपट विनोदी वळणाने पुढे जाणारा चित्रपट होता. पुढे गूढ आणि रहस्यमयी चित्रपट त्यांनी दिला आणि तो म्हणजे ‘लाल इश्क़’. एका रहस्यमयी खुनाच्याभोवती फिरणारे कथानक व नेमका खुनी कोण हि उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट. चित्रपटाचा बाज हा जरा वेगळा होता पण दिग्दर्शिका प्रेक्षकांची उत्स्तुकता  ताणून धरण्यात यशस्वी झाल्या.

२०१८ हे वर्ष त्यांच्य्साठी खूपच भाग्यादायी असावे कारण त्यांनी ह्या वर्षी ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी नाटकावर आधारित चित्रपट ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसदप मिळाला. या चित्रपटातून जेष्ठ दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांच्या मुलीने म्हणजे तृप्ती तोरडमल हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्या घेवून येते आहेत नवीन मराठी चित्रपट ‘माधुरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे सोनाली कुलकर्णी आणि पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर शरद केळकर अभिनय करत आहे. या दोघांची खास केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजून एक महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटात त्यांची कन्या संहिता जोशी ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आई दिग्दर्शिका आणि मुलगी अभिनेत्री असे हे मराठी चित्रपटसृष्टीत कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असावे.

स्वप्ना वाघमारे जोशी तुम्हाला तुमच्या आगामी माधुरी या चित्रपटासाठी फिल्मिभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा…

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author