बघा २०१८ चे मराठी चित्रपटातील तिकीटबारीवरचे अनभिषिक्त सम्राट कोण आहेत..!!

बघा २०१८ चे मराठी चित्रपटातील तिकीटबारीवरचे अनभिषिक्त सम्राट कोण आहेत..!!

 

“जय महाराष्ट्र”….. हे फक्त राजकारणासाठीच वापरायला पाहिजे असं स्लोगन नाही. २०१८ च्या मराठी चित्रपटांच्या जबरदस्त यशासाठी सुद्धा वापरायला पाहिजे, कारण आपलं राज्य मराठी, आपले चित्रपट मराठी, आपले जबरदस्त अभिनेते मराठी, त्यांनी केलेल्या अफलातून भूमिका मराठी,  प्रेक्षक मराठी, आणि त्यांना मिळालेला आनंद पण मराठीचकी….म्हणून “जय महाराष्ट्र”. 

एकापेक्षा एक अफलातून चित्रपट ह्या वर्षात आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस असा वर, वर, चढत चाललाय हे जाणवतं. ह्याचं कारण काय असेल?  तर आजच्या सगळ्या अभिनेत्यांमधलं टॅलेंट. चित्रपट बघताना उभं राहतं त्या त्या प्रसंगातलं वास्तव. आता जो हे हुबेहूब साकारतो तो होतो मोठा अभिनेता. त्याची वाढते लोकप्रियता, असे ह्यावर्षी बरेच अभिनेते लोकप्रिय ठरले. त्यांच्यातले अभिनयाचे पैलू  सगळ्यांना आवडले. म्हणून ह्या सगळ्याच चित्रपटांनी चांगलीच कमाई केली. कोण कोण आहेत हे गाजलेले अभिनेते? बघा तर जरा नजर फिरवून….

 

READ ALSO :  ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

८ – एक वेगळा चित्रपट आला होता त्याचं नाव होतं ‘चुंबक’ त्यातला  चमकलेला स्टार  “स्वानंद किरकिरे”. गतिमंद  लोकांच्या जीवनावर होता तो चित्रपट. त्यांचे वेगवेगळे मूड , त्याप्रमाणे त्यांची वागणूक. असा अवघड विषय आणि अवघड अभिनय सहज सकारलाय.  मुळात हिंदी , मराठी गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वानंद किरकीरेंनी त्यात भारी काम करून लोकांना भावूक बनवलं.

७ –  जाऊ दे नं वं… म्हणत सुपरहिट ठरला तो नाळ चित्रपटाचा हीरो ‘चैत्या,’  म्हणजेच “श्रीनिवास पोकळे”. प्रेमाची नाळ आई , वडील , आणि त्याची आजी, ह्या छोट्या जगाशी जोडलेली आहे. त्या पलीकडे त्याचं कोणीच नाही. पण जाण आली की जग कळायला लागतं. खरी नाती गोती समजायला लागतात. एवढ्या छोट्या कलाकाराने हा बदल दाखवून दिलाय. तुटलेली नाळ, आणि जोडलेली नाळ ह्यातला फरक दाखवून दिलाय. म्हणून हा छोटा हीरो रसिकांना भावला.

६ – चिन्मय मांडलेकरला  छोट्या स्क्रीनवर ऐतिहासिक भूमिकेत नाही बघितलं, पण मोठ्या पडद्यावर  पहायला मिळाली ती ‘छत्रपती शिवाजी महाराजांची’ भूमिका. आता चिन्मय मांडलेकर म्हणजे अभिनय कोळूनच प्यायलेला अभिनेता म्हणून नावाजलेला आहे. त्यानं कोणतीही भूमिका केली तरी कसदार असणार. पण छत्रपती शिवाजी महाराज साकारणारे काही मोजकेच शोभून दिसतात. ‘फर्जंद’ सिनेमातली चिन्मयची ही महाराजांची भूमिका भारीच आवडली सगळ्यांना. म्हणून विशेष उल्लेख करावा लागतो. एक दमदार भूमिका.

५ – मुळशी पॅटर्न मधला एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील साधा सरळ तरुण साकारणारा गुणी कलावंत म्हणजे ‘ओम भूतकर’ सगळ्यांच्याच लक्षात राहतो. समाज व्यवस्था कोणाला कुठे पोचवेल सांगता येत नाही. साधा सरळ माणूस खून करतो म्हणजे त्याच्यात कशामुळे किती बदल होऊ शकतो हे ओमच्या जबरदस्त भूमिकेतून साकार झालंय. अगदी पाहिजे तसं, म्हणून ओम भूतकरचा हा रोल लक्षात राहतो.

४ – माऊली हा रितेश देशमुखचा एक चांगला चित्रपट आपल्याला ह्या वर्षात पाहायला मिळाला. एका रितेशने दोन माऊली उभे केलेत. दोन्हीपण चांगल्या भूमिका सकारल्यात त्याने. आपलासा झालेला रितेश लोकांना आवडला. त्यामुळे त्याने रसिक प्रेक्षकांना प्रेम करायला भाग पाडलं आहे.

३ – अशोक सराफ आणि पोलीस हे बऱ्याच चित्रपटात आपण पाहिलंय, हिंदीत पण त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मराठीतला हा दिग्गज कलावंत मनापासून भूमिका साकारताना रसिकांना भिडतो. सिंघम मध्ये पण त्यांनी हवालदार उत्तम साकारलाय. तसाच ‘मी  शिवाजी पार्क’ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल उभा केलाय. आत एक आणि बाहेर दुसरा  असा तो रोल होता. म्हणजे आत दुःख असलं तरी बाहेर दिसत नाही. अशा मनाच्या दोन्ही अवस्था दाखवल्या आहेत. ते साकारणं हे अशोक सराफच करू शकतात.

२ – मुंबई पुणे मुंबई-३. आज मोठी कमाई करणारा चित्रपट म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत गाजतोय. ‘स्वप्नील जोशीच्या’ सहज अभिनयामुळे. आधी नवखा आणि नंतर जबाबदार जोडीदार दोन्ही अगदी सहज दाखवून प्रेक्षकांची पसंती मिळवली त्याने.

१ – “आणि डॉ. काशीनाथ घाणेकर” ह्या नाट्य आणि चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर  जोरदार कमाई करणाऱ्या चित्रपटात काशीनाथ घाणेकरांच्या अनेक भूमिका तंतोतंत साकारून दोन्ही प्रेक्षकांची वाहवा मिळवलेला एक अभिनय संपन्न कलाकार म्हणजे “सुबोध भावे”.  लो. टिळक, बाल गंधर्व, कट्यार, आणि आता डॉ. काशीनाथ घाणेकर यासे बायोपिक करून सुबोध भावे ह्या वर्षीचा बॉक्स ऑफिसचा खरा लांडगा ठरलाय..

असे हे सगळे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले लखलखणारे तारे.  ह्यांच्या ह्या जबरदस्त टॅलेंट्स मुळे आज हिंदी चित्रपट सृष्टीतले अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक मराठीकडे आकर्षित झाले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ सुरू झालाच आहे. असेच एकापेक्षा एक, अभिनयात तोडीसतोड सितारे अजून काय नवीन घेऊन येतील ते २०१९ चे वर्ष संगेलच..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author