वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

 

नाटक, सिरिअल्स आणि सिनेमा पर्यंत मर्यादित असलेले कलाक्षेत्र ह्या शतकात आता डिजिटल झालेले आहे. इंग्लिश आणि हिंदी वेबसिरीज चा भरपूर बोलबाला चालू आहे. आता ह्या स्पर्धेत उतरलेत मराठी वेबसिरीजवाले आणि मराठी कलाकार..! कसं आहे ना एखाद्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना असते. पण त्याचा धड ना सिनेमा होऊ शकत ना वर्षानुवर्षे चालणारी सीरिअल. मग काय करावं..?? त्या कथेचे बारा पंधरा भाग करायचे. त्याचं जोरदार शूटिंग करायचं. विनोद किंवा ऍक्शन चा भरपूर मसाला घालायचा आणि अशी ही सिरीज इंटरनेटवरच्या प्रेक्षकांसाठी आणायची. वेबसिरीजचीही झिंग आता चांगलीच मूळ धरून उभी राहिलीये.. आपल्याकडच्या खंदया कलाकारांनी त्यात जम बसवला आहे. पाहुयात कोणी किती तिर मारलेत ह्या क्षेत्रात.. 

 

READ ALSO :  महागुरू सचिनजी पिळगावकर घेऊन येत आहेत आजच्या तरुणाईसाठी खास व्हॅलेंटाईन डे स्पेशल चित्रपट..!!

१. राधिका आपटे: वेबसिरीजच्या जगतातलं हे खूप मोठं नाव आहे. नेटफ्लिक्सच्या भारतातील सिरीज हिच्या शिवाय पूर्णच होत नाहीत म्हणा ना..! सेक्रेड गेम्स, घौल, लस्ट स्टोरीज अशा हिंदी वेबसिरीज मधून राधिका आपटेने स्वतःला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिलीये.

२. मिथिला पालकर: अगदी गोड मुलगी. पण अभिनयात मात्र बाप माणूस आहे.. हटके सिनेमे आणि वेबसिरीज ही तिची खासियत. 

३. जितेंद्र जोशी: मराठी सीरिअल्स, नाटक आणि सिनेमा इतक्यापुरतंच आपलं करिअर सीमित न ठेवता, हिंदी वेबसिरीज मध्ये आपला वेगळा ठसा उमतावलाय तो जितेंद्र जोशीने.. सेक्रेड गेम्स पासून जितेंद्रने चांगलीच ओपनिंग केलेली आहे. आता पुढे काय करेल ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

४. सई ताम्हणकर: सांगलीतून आलेली असली तरी ही मराठीतली हॉट अँड हॅपनिंग अभिनेत्री नवीन क्षेत्रापासून दूर कशी राहील. तिचा ‘डेट विथ सई’ चा पहिला सिझन नुकताच येऊन गेला आहे आणि पुढेही ती चांगले विषय मिळाल्यास वेबसिरीज करत राहील.

५. भाऊ कदम: विनोदाचा बादशहा म्हणजे आपला भाऊ कदम. स्ट्रगलर साला आणि लिफ्टमॅन ह्या वेबसिरीज मधून त्याने रसिकांसाठी हास्याचा खजिना आणला आहे.

६. अमेय वाघ: बॉय नेक्स्ट डोर इमेज ला मागे टाकून विविधांगी अभिनयात सरस ठरलेला अभिनेता म्हणजे अमेय वाघ. कास्टिंग काऊच ह्या वेबसिरीज मध्ये त्याने दमदार पाऊलही टाकलेले आहे.

७. आकाश ठोसर: सैराटमधल्या सालस मुलाच्या रोल नंतर लस्ट स्टोरीज ह्या वेबसिरीज मधल्या रोमँटिक लव्हर बॉय आकाश ठोसरनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे.

८. राजश्री देशपांडे: बोल्ड सिन केल्यामुळे सेक्रेड गेम्स ह्या वेबसिरीज मधून गाजत असलेले अजून एक नाव म्हणजे राजश्री देशपांडे. तिच्या अभिनयचेही तितकेच कौतुक होत आहे.

९. संतोष जुवेकर: डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या संतोषने स्ट्रगलर साला ह्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांची मने जिंकलीच आहेत. ह्या शिवाय ह्याच सीरिअल च्या दुसऱ्या भागातही ह्याने काम केले आहे.

१०. अनिकेत विश्वासराव: वेबसिरीज आणि बोल्ड कन्टेन्ट ह्याचं साटं – लोटं आहे. ‘पॅडेड की पुश अप’ नावाच्या ऍडल्ट कॉमेडी वेबसिरीज मधून अनिकेत लवकरच सगळ्यांच्या भेटीला येत आहे. 

२०१९ अजूनही खूप अभिनेते अभिनेत्री वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे तेच तेच सिनेमे किंवा सिरिअल्स ला कंटाळलेला प्रेक्षकवर्ग ह्या वेबसिरीजना मिळणार हे नक्की…!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...