२०१८ चे धमाकेदार चित्रपट ज्यांनी जिंकलं मराठी चित्रपट रसिकांना आणि भुरळ पाडली हिंदी निर्मात्यांना सुद्धा.

२०१८ चे धमाकेदार चित्रपट ज्यांनी जिंकलं मराठी चित्रपट रसिकांना आणि भुरळ पाडली हिंदी निर्मात्यांना सुद्धा.

 

ह्या वर्षी म्हणजे संपूर्ण २०१८ सालात आलेले “मराठी चित्रपट” म्हणजे पुण्यामधल्या गणपती च्या मिरवणुकीत एकापाठोपाठ वाजत गाजत  येणाऱ्या  मानाच्या गणपती सारखेच गाजत, चित्रपट रसिकांची मने जिंकत जिंकत, आनंद देत गेले.  करमणुकीचा अखंड वर्षाव, हे वर्ष म्हणजे भन्नाट चित्रपटांची निर्मिती. चांगले स्मरणात राहतील असे विषय, सगळ्यांचं काहीतरी वेगळं आणि विशेष महत्त्व सांगावेसे असे हे चित्रपट. बघूया कोणकोणत्या चित्रपटांनी हे वर्ष गाजवलं.

* नाळ :

 

READ ALSO :  महागुरू सचिनजी पिळगावकर घेऊन येत आहेत आजच्या तरुणाईसाठी खास व्हॅलेंटाईन डे स्पेशल चित्रपट..!!

नागराज मंजुळेचा हा ‘वेगळा विषय’.एका लहान मुलाची जोडली गेलेली नाळ, आणि खरी पण तुटलेली नाळ , त्यातल्या प्रत्यक्ष नात्यातला अनुभव ह्यावर तयार झालेली ही पटकथा, नागराज मंजुळेचीच, दिग्दर्शन त्याचेच, आणि महत्वाची त्याची भूमिका एक वास्तव प्रेक्षकांसमोर  ठेऊन  मने जिंकण्यात यशस्वी झाली.

 

* सविता दामोदर परांजपे:

“सविता दामोदर परांजपे” एक रहस्यपट. ह्याच नावाच्या गाजलेल्या नाटकावर आधारलेला हा चित्रपट होता. रहस्य आणि त्यातली भीती काय असते ही प्रेक्षकांनी अनुभवली. रहस्यपट आवडणाऱ्या लोकांनी ह्या चित्रपटाला भरपूर गर्दी केली.

 

* चुंबक : 

हिंदी अभिनेता ‘अक्षय कुमार’ निर्माता असलेला हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट. गतिमंद मुलांच्या आयुष्यवर चित्रित झालेला स्वार्थीवृत्ती आणि निस्वार्थ सेवा ह्या दोन गोष्टींचा अर्थ उलगडून देणारा हा चित्रपट. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपट सृष्टीत गीतकार म्हणून नावाजले गेलेले ‘स्वानंद किरकिरे’ ह्यांची ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. हाही चित्रपट वेगळा विषय म्हणून चांगला गाजला. 

 

* फर्जंद :

कोंडाजी फर्जंद म्हणजे  प्रचंड शक्ती आणि  अफाट साहस ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असलेला, समोर कितीही ताकतवान शत्रू असेल तरी त्याच्यावर विजय मिळवणारा जिगरबाज मावळा. आपण फक्त आपल्या राजासाठी लढायचं, इतकंच ठाऊक असलेला हा बेफाम लढवय्या. शिवाजी महाराजांचा निष्ठावान मावळा. त्याची ही साहस कथा. अतिशय उत्तम तंत्रज्ञानाचा वापर केलेला हा चित्रपट अतिउत्तम ठरला.

 

* गुलाबजाम :

एक गोड पण जरा वेगळी कथा. सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी अशी जरा वेगळीच जोडी. त्यांनी तयार केलेल्या  टेस्टी  रेसिपीज , रसिक प्रेक्षकांना खूप आवडल्या, म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. एक सगळ्या रसांनी चविष्ट झालेला गोड चित्रपट, म्हणून गाजला.

 

* आपला मानूस :

नाना पाटेकर  सोबत इरावती हर्षे, सुमित राघवन.  नाना असला की तो चित्रपट गाजणार असं समीकरण झालं आहे. म्हणून हिंदी अभिनेता  ‘अजय देवगण’  ह्याने ह्या चित्रपटाची निर्मिती केली. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी करणारा ठरला. लोकांना चांगलाच भावला.

 

* न्यूड :

विषय खूपच वेगळा, म्हणजे लैंगिकता, लैंगिक शोषण. त्यावरचे वास्तव, त्यात वाहवत गेलेले लोक. ह्या विचित्र पण वास्तव असलेल्या गोष्टी निर्माता दिग्दर्शक ‘रवी जाधव’ ह्यांनी समाजासमोर आणल्या. म्हणून हा चित्रपट जरा वेगळा म्हणून गाजला. छाया कदम, आणि कल्याणी मुळे ह्या दोघी अभिनेत्रीचं कौतुक झालं,  हा चित्रपट ‘फिल्म फेसव्हल’  मध्ये चांगलाच गाजला.

 

* मुळशी पॅटर्न :

जमिनीचे वाद, जमीन माफिया, त्यावरून शून्यातून साम्राज्य निर्माण करणारे अंगठे बहाद्दर, आणि त्यांच्यावर वरदहस्त ठेवणारे भ्रष्ट नेते, ह्यांच्या साट्या लोट्याला लोकांसमोर उघड करणारी ही कथा, त्यात बळी जाणारे सर्वसामान्य लोक, त्यातून निर्माण होणारे ‘डॉन’. असं सध्याचं वास्तव दाखवणारा हा चित्रपट लोकांनी चांगलाच पसंत केला. 

 

* मुंबई- पुणे- मुंबई-३.

हाही चित्रपट रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. मुंबई आणि पुण्याचे नाते, त्यातून जोडली गेलेली दोन घरे, त्यातली नात्यातली ओढ, दुरावा, प्रेम, थोडा तिखट ठसका, ह्या सगळ्या प्रसंगांची योग्य गुंफण, आणि आनंद. ह्यामुळे आपल्याच घरात घडत असलेले हे प्रसंग वाटतात, म्हणून ह्या चित्रपटाने खूप वाहवा मिळवली. स्वप्निल जोशी, आणि मुक्त बर्वे  ह्यांना सुद्धा रसिकांची चांगली दाद मिळवली.

 

* आणि डॉ. काशीनाथ घाणेकर.

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ खेचून आणणारा एक रगेल आणि रंगेल अभिनेता म्हणजे डॉ. काशीनाथ घाणेकर. आपल्या अभिनयाच्या अनेक रंगांनी त्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात वर्चस्व सिद्ध केलं. ह्या कलाकाराला पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांनी एका सध्याच्या सर्वगुण संपन्न कलाकाराच्या माध्यमातून साकार केलं आणि प्रेक्षकांना संतुष्ट केलं. तो गुणी कलाकार म्हणजे ‘सुबोध भावे’ आणि  त्याचा  सध्या बॉक्स ऑफिसवर अजूनही चांगली कमाई करत असलेला गाजलेला चित्रपट म्हणजे ” आणि डॉ. काशीनाथ घाणेकर”.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author