मित्रांनो आजचा दिवस राखून ठेवा, महेश मांजरेकरांचा भाई येतोय..!!

मित्रांनो आजचा दिवस राखून ठेवा, महेश मांजरेकरांचा भाई येतोय..!! 

 

नाही हो.. वॉन्टेड वाला ‘भाई’ नाही की दबंग वाला भाई नाही.. मुळात हिंदी भाई नाहीच.. पण ते मोस्ट वॉन्टेड  तर होतेच आणि हास्य दबंग होते असे म्हटले तरी गैर नाही.. म्हणजे आज खरच आपले मराठी भाई येणार आहेत..!! भाई देशपांडे.. म्हणजे तुम्हा आम्हाला माहीत असलेले पु लं देशपांडे.. बटाट्याच्या चाळीतून थेट आपल्या सिनेमा घरात.. महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं आणि गोड व्यक्तिमत्व..!!

आजू बाजूच्या सगळ्या लोकांचं बारीक निरीक्षण करायचे भाई.. हे लोकच त्यांचे हिरो.. म्हणजे त्यांच्या कथांचे हिरो हो..!! भाईंच्या कथा अत्यंत मार्मिक.. माणसांवर तर कोटी करायचेच पण म्हैस, कुत्रा, मांजर, पोपट अशा प्राण्यांनाही ‘विनोद वीर’ बनवून टाकले.. ते ‘भाई युग’ च वेगळं होतं.. पुस्तकं काय आणि कथाकथन काय.. नुसता हास्याचा पूर.. कथाकथनात एकेक किस्सा रंगवून रंगवून सांगावे तर पुलंनी.. तसे पूर्वी रंगमंचावर प्रयोग व्हायचे पण पुलं एकटेच रंगमंच गाजवायचे.. एकपात्री कथाकथन.. त्याचा एक मजेदार किस्सा ही पुलं सांगतात.. सुरुवातीला आता सारखे गावोगावी जाऊन प्रयोग तसे कमीच व्हायचे. मग पुलं चं हे कथाकथन पोहोचवायचं कसं..?? तर तेव्हा सिनेमे बनवायच्या कॅमेराने पुलंच कथाकथन रेकॉर्ड केलं गेलं.. बरं कथाकथन करणार म्हणजे पुलं जागेवर उभे राहणार.. म्हणून कॅमेरामन नि पण हलायची तसदी घेतली नाही.. थेटरात लांब कॅमेरा लावून सेट करून टाकला.. तो थेट शेवटाला हलवला.. भाईंनी उत्सुकते पोटी रेकॉर्डिंग बघायला घेतलं तर डोक्यावर हात मारून घेतला.. का..? तर त्या रेकॉर्डिंग मध्ये कॅमेरा लांब असल्याने भाई इटुकले पिटुकले दिसत होते.. चेहऱ्यावरचे हावभाव तर कळतही नव्हते.. थोडक्यात काय तर कळसूत्री बाहुलीच्या खेळ वाटत होते.. आता नाटक एकपात्री का असेना पण ते जवळूनच पाहायचं असतं.. अभिनय आणि आवाज मागे थोडीच पोचणार आहे..?? 

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

पुलंनी आयुष्यात असे एकेक मजेदार अनुभव घेतलेत आणि त्यांच्या हजरजबाबीपणापुढे मोठ्या मोठ्या उणिवा, प्रॉब्लेम सगळे हास्यात रूपांतरित होत असत.. आता पुन्हा हे भाई युग अवतरणार आहे.. तर मंडळी आज आपापल्या सिट्स बुक करा बरं..!! पॉपकॉर्न समोसे सगळा लवाजमा घेऊन बसा.. नाही.. कसं आहे ना, एकदा खुर्चीला खिळलात की भाई उठू द्यायचे नाहीत.. हसवून हसवून थेटर च हास्य मंडळ होईल.. कारण समीकरणच तसे आहे, ‘जिथे पुलं तिथे हास्याची फुलं’..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author