भाई, व्यक्ती की वल्ली – फक्त अनुभवायचा

भाई, व्यक्ती की वल्ली – फक्त अनुभवायचा

 

प्रसिद्ध व्यक्तीचं बायोपिक काढणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांनी केलेल्या गोष्टी, त्यांचे किस्से जसेच्या तसे उभे करायला सुद्धा सखोल माहिती काढावी लागते.. त्या व्यक्तीच्या बालपणापासून शेवटापर्यंतचे सगळेच कंगोरे खूप चलाखीने दाखवावे लागतात. अर्थात कोणत्याही चित्रपटला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ ही असतेच.. त्यामुळे एखादा लहानसा किस्सा ही रंगवून सांगू शकतो. ‘भाई, व्यक्ती की वल्ली’ ह्या सिनेमाचा पूर्वार्ध सुरेख रंगला आहे. सहसा एखाद्या व्यक्तीचे चित्रण हे दिग्दर्शकाच्या चष्म्यातून असते.. आपल्यालाही प्रेक्षक म्हणून तोच चष्मा घातला जातो. पण पुलं हे असे वल्ली होते ज्यांचा चष्मा ते स्वतःच आपल्यावर चढवू शकतात. भाई बघताना ह्या ‘पुलं युगात’ गेल्याची अनुभूती आपल्याला मिळते.. 

भाईंचं आयुष्य म्हणजे त्यांच्या वडिलांनी जन्मपत्रिकेत पाहिलेली आणि सांगितलेली गोष्टच जणू.. तंतोतंत खरी.. विनोदवीराचे पाय पाळण्यात नाही तर त्याच्या बोलण्यात दिसतात हो.. पुलं आपल्याला आयुष्यभर आणि गेल्यानंतरही त्यांच्या साहित्य रूपाने कसे हसवू शकतात हे त्यांच्या बालपणातून समजते. विनोदबुद्धी जन्मतः असावी लागते. शिकून मिळत नसते. त्यातून अभिनयाचा कीडा.. म्हणजे तो माणूस अवलीयाच जणू..  मात्र अशा हरहुन्नरी कलाकारांबरोबर राहणाऱ्या लोकांचं काही खरं नसतं बुवा.. कधी मूड पालटेल आणि कधी काय करतील सांगता येत नाही.. त्यामुळे पुलं जरी बाहेरच्या प्रत्येकाला एकदम ‘भारी’ वाटत असले तरी घरच्यांना मात्र त्यांच्या विविध रंगांनी – ढंगानी जेरीस आणले होते. त्यांच्या यशात खरे तर आई , भाऊ आणि सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर द्वितीय पत्नी ‘सुनीताबाईंचा’. पुलंसारखी आसामी सांभाळून घ्यायचं काम सुनिताबाईंचंच.. तेथे पाहिजे जातीचे..!! कारण पुलं दुसऱ्या कोणाला झेपलेच नसते.. शेवट पर्यंत त्यांच्या खळाळत्या झऱ्यात वाहत गेलेल्या सुनिताबाईंचं देखील कौतुक ह्या सिनेमाच्या निमित्तानं केलं पाहिजे. 

 

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

पुलं हे इतके मोठे व्यक्तिमत्व होते की त्यांचे किस्से दोन भागात सांगावे लागणार आहेत. पूर्वार्ध खासा रंगला आहे. सागर देशमुख हा भाई म्हणून अगदी परफेक्ट. ते दोन ससुल्यासारखे दात, तो निरागसपणा, ते अवखळ विनोद, शाब्दिक कोट्या, हालचाल, लकबी सगळे सागरने उत्तम रंगवले आहेत. सुनिताबाईं सारखे गंभीर आणि खंबीर व्यक्तिमत्व पूर्वार्धात ‘इरावती हर्षे’ ह्या अभिनेत्रीने तंतोतंत उभे केले आहे. बाकी सगळ्या निष्णात कलाकारांची मांदियाळी आहेच. महेश मांजरेकर यांचा पुलं विषयीचा अभ्यास, निरीक्षण आणि सिनेमात सगळीच पात्र सेम टू सेम उभी करण्याच्या हातखंड्याला सलाम..!! पुलंच्या जमान्यातील सगळ्या गोष्टी बारकाईने उभ्या केल्या आहेत. त्यांच्या बरोबरीचे दिग्गज आणि त्यांच्यातली मैत्री आणि मैफिली पाहण्यास खास मज्जा येते. गदिमा, वसंता, कुमार, भीमसेन अशी मित्रमंडळी, बाळासाहेबांसारखे शिष्य, पहिली पत्नी, ह्या पुलंच्या आयुष्यातील माहिती असलेली आणि नसलेली वळणे पण सुंदर दाखवली आहेत. लवकरच म्हणजे ८ फेब्रुवारीला अजून काही किस्से रंगतील ह्यात शंका नाही.. तर मग रसिकांनो पूर्वार्ध पाहून घ्याच त्याशिवाय उत्तरार्धाची कहाणी सुफळ संपूर्ण कशी होईल..?!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author