ह्या चित्रपटाचे दोनच भाग काय, तर एकावर एक कितीतरी भाग काढले तरी हिट होईल अशीच आहे ‘ह्यां’ची महती..

ह्या चित्रपटाचे दोनच भाग काय, तर एकावर एक कितीतरी भाग काढले तरी हिट होईल अशीच आहे ‘ह्यां’ची महती.. 

 

पु लं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. त्यांची पुस्तकं वाचत वाचत गेली काही वर्षे कित्येक मराठी पिढ्या लहानाच्या मोठ्या होत आहेत. किमान ३ ते ४ जनरेशन त्यांची कथाकथने ऐकून तृप्त झाली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत तर त्यांच्या पुस्तकातील काही प्रसंग, धडे म्हणून असायचे आणि तो धडा कधी एकदा शिकवला जाईल ह्याकडेच त्या वर्गातील मुलांचं मन वेधलेलं असायचं. जेव्हा त्यांच्या धड्याचे वाचन सुरू होई तेव्हा त्या वर्गातून हास्यकल्लोळ ऐकू येई. गम्मत म्हणजे पुस्तक हातात पडल्या पडल्या पु लं चा कोणता धडा आहे तो बघून किमान १० वेळा आधीच वाचून व्हायचा. पु लं न आवडणारे विरळाच असतील. प्रत्येक मराठी घरात पुलं च एक तरी पुस्तक नक्कीच सापडेल. पुलंची पात्रे ते स्वतःच त्यांच्या कथाकथनातून रंगवून रंगवून सांगत. इतकी की नारायण, अंतू बरवा असे सगळे एकेक डोळ्यासमोर उभे राहतं. खरोखरीच आपणच लिहिलेली पात्रे इतकी जिवंत करू शकणारा पुलंसारखा विनोदी लेखक पुन्हा होणे नाही.. 

महाराष्ट्र वैभव पु ल देशपांडे ह्यांच्यावर लवकरच एक मराठी बायोपिक येतोय. ४ जानेवारी २०१९ रोजी ‘भाई’ आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी साक्षात अवतरणार आहेत. त्या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत सागर देशमुख आणि इरावती हर्षे. अर्थातच भाई म्हणजेच पु लं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या बालपणापासून चित्रपटात दाखवणार आहेत. महेश मांजरेकर ह्यांनी ह्या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. त्यांचे एकंएक मराठी चित्रपट अतिशय दर्जेदार असतात हे आपल्याला माहीतच आहे. आणि आता पु लं सारख्या विषयावरची मांडणी म्हणजे अफलातून असणार हे तर ट्रेलर मधूनच दिसून येतंय. ट्रेलर मधील मजेशीर संवाद ऐकता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. पु लं, त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांची दोस्तमंडळी, त्यांच्या अंगचे इतर गुण, कला आणि आयुष्यातील उत्तरार्ध म्हणजे, त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे, त्यांचं सगळं लिखाण, त्यांची अफलातून पात्रं असं सगळंच जिवंत होणार ह्या सिनेमाच्या माध्यमातून. भाई फक्त लिखाणातच नाहीत तर संगीत, गायन आणि अभिनय ह्या सगळ्याच क्षेत्रात आपलं नशीब आजमावलेले एक वल्लीच जणू..!!  

 
 

READ ALSO :  मर्डर पण परफेक्ट असतो बर का..!! आणि तो होणार लवकरच रंगमंचावर..!

‘भाई – व्यक्ती की वल्ली’ पूर्वार्ध अशा नावाचे पोस्टरही सगळीकडे झळकू लागलेत. आता पूर्वार्ध म्हटल्यावरच सूचित होते की उत्तरार्ध असणारच. पुलंच व्यक्तित्वच इतकं अफाट आहे की अडीच तासात ते बसवणं अवघडच. महेश मांजरेकर म्हणतात, “पुलंना अडीच तासांच्या सिनेमात बांधणं केवळ अशक्य. त्यातून त्यांच्या जीवनाच्या बारीक बारीक गोष्टी मला प्रेक्षकांना दाखवायच्यात म्हणून दोन भागात त्यांची गोष्ट आम्ही विभागून दाखवणार.” म्हणजे ४ जानेवारी २०१९ ला पूर्वसरध आणि ८ फेब्रुवारी २०१९ ला उत्तरार्ध. म्हणजे मराठी जनतेला एक महिन्यात पहिला भाग आणि जास्ती उत्सुकता न ताणता दुसऱ्या महिन्यात दुसरा भाग देखील बघायला मिळणार तर. खर तर ह्याचे कितीही भाग काढा सिनेमा चालणार हे नक्कीच. मराठी सिनेमात असा बॅक टू बॅक सिनेमाचा हा पहिलाच प्रयोग होणार आहे. आणि तो यशस्वी होणार ह्यात शंका नाही. हळू हळू मराठी चित्रपटसृष्टीत एका पाठोपाठ एक असे दोन भाग काढून सिनेमा दाखवण्याची ही नवी नांदीच जणू. असो ‘भाई’ साठी फिल्मीभोंगा तर्फे एक शुभेच्छा हास्यमुद्रा.. म्हणजे स्मायली हो..!! 

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author