भाऊंची कमाल आणि “लिफ्टमॅन” मधून धमाल

आतापर्यंत सुपरमॅन, स्पायडरमॅन, पँडमॅन असे कितीतरी मॅन येऊन गेले आहेत आणि आता आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी मराठी मध्येही एक असाच मॅन आलेला आहे तो म्हणजे “लिफ्टमॅन”.आणि त्यातले हे मॅन आहेत , “चला हवा येऊ दया”या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले भाऊ कदम.

“लिफ्टमॅन” ही मराठी सिच्युएशनल कॉमेडी वेबसीरिज आहे.आणि ती आता आपल्या मनोरंजनासाठी तयार झाली आहे.

“झी ५” वर  २६ जुलैला सुरू झालेली लिफ्टमॅन ही दहा भागांची वेब मालिका आहे. प्रत्येक भाग आठ ते दहा मिनिटांचा असून,  या सिरीजचे एकुण दहा भाग आहेत.

या मालिकेचे बहुतेक शूटिंग लिफ्टमध्ये झाले आहे.लिफ्ट मधून  खाली-वर जाताना भाऊंना अनेकांबरोबर बोलण्याचा प्रसंग येतो.त्यात काही विदेशीही असतात.आता भाऊला (म्हणजे एका लिफ्टमनला )त्यांच्याबरोबर इंग्लिश बोलायला लागली तर काय धमाल उडेल ?आणि त्यात भाऊसारखा कलाकार म्हणजे हास्याची कारंजी फूलवणारच यात शंका नाही. कारण विनोदाचे टायमिंग भाऊ कदम कसे साधतात हे अख्या महाराष्ट्राने यापूर्वीच बघितलेले आहे.

लिफ्ट मध्ये भाऊंना वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाची माणसे भेटतात व भाऊ त्या माणसांशी कसे वागतो.परिस्थिती एकच पण सगळ्यांच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या कशा असतात हे “लिफ्टमॅन”या सिरीजमधून पहायला मिळणार आहे.

 

READ ALSO : PUSHPAK VIMAN : MOVIE REVIEW

याआधी “भाडिपाच्या”अनेक वेब सीरिजमधून दिसलेली “पॉला” भाऊ कदमसोबत या सीरिजमध्ये दिसणार आहे.

विशेष म्हणजे या वेब सिरीजची सर्व शूटींग जवळजवळ लिफ्टमध्येच झाली आहे.लिफ्ट आणि त्यातल्या लिफ्टमॅन या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून ही वेब सिरीज बनवली गेली आहे. यातले कलाकार कशा प्रकारचा गोंधळ घालणार आहेत, लिफ्टमध्ये कोण कसा वागतो, त्यातून हा लिफ्टमॅन काय  प्रतिक्रिया देतो.व यातल्या प्रसंगातून काय धमाल होते हे पाहणे मनोरंजक असेल.

या मालिकेबद्दल भाऊ कदम म्हणाले, ”लिफ्टमॅन”ची  संकल्पना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि झी ५ सारखे माध्यमांचे नवीन मार्ग स्वत:ला आपसूक अशा कल्पक संकल्पनेकडे  कसे घेऊन जातात हे बघून मी रोमांचित झालो आहे. या मालिकेसह मी वेबच्या जगात शीर्षक भूमिकेद्वारे प्रवेश करत आहे. प्रवेशासाठी याहून अधिक चांगली संकल्पना मला निवडता आली नसती. स्मार्टफोन आता इतका सहज झाला आहे की, प्रेक्षकांपुढील मनोरंजनाचे पर्यायही हळुहळू बदलत आहेत. आज सर्वकाही शब्दश: एखाद्याच्या हाताच्या बोटांवर आहे आणि अशा परिस्थितीत मागे राहून कसे चालेल?

तर झी ५ चे बिझनेस प्रमुख मनीष अगरवाल म्हणाले, “मराठी भाषिक” प्रेक्षकांची मनोरंजनाची जाणीव किती विकसित आहे हे आपल्या रंगभूमी व चित्रपटांच्या समृद्ध वारशातून दिसून येते. विनोद, समृद्ध संकल्पना, आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा आणि या क्षेत्रातील प्रख्यात कलावंत हे सगळे काही लिफ्टमॅनमध्ये आहे. मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आज भाऊ कदम हे नाव अनेक अंगांनी विनोदाला समानार्थी म्हणून घेतले जाते. आमच्या सहज येता-जाता बघण्यासारख्या आठ दहा  मिनिटांच्या छोट्याशा विनोदी वेब मालिकेतील लिफ्टमॅनची  भूमिका त्यांनी निवडली याचा मला आनंद वाटतो.”

“झी५” हे अॅप गूगल प्ले स्टोअरमधून आणि आयओएस अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. www.zee5.com वरही ते प्रोग्रेसिव्ह वेब अॅप (पीडब्ल्यूए) म्हणून उपलब्ध आहे. तसेच अॅपल टीव्ही व अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिकवरही उपलब्ध आहे.

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.