मराठी ताऱ्यांचे ‘कृष्णधवल’ फोटोशूट.. अत्यंत सुंदर आणि ऑफबीट फोटोशूट ठरलंय चाहत्यांसाठी पर्वणी..!!

वेगवेगळे फोटोशूट करून सतत चाहत्यांच्या चर्चेत राहणे ही अभिनेत्यांची नित्येची बाब.. पण ह्या वेळीमात्र चर्चा होतेय एक कौतुकास्पद फोटोशूट ची.. विषयच तसा आहे. ‘स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक’ अशी ऐतिहासिक फोटोशूट थीम तीही कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाइट फोटो..!! अशी भन्नाट कल्पना घेऊन नुकतेच आपल्या मराठी ताऱ्यानी ‘हटके’ फोटोशूट केलेलं आहे. कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री कोणत्या वेशात आहे ते पाहणे अतिशय रंजक आहे. काही अभिनेते तर वेशांतरामुळे ओळखुही येत नाहीत इतके हुबेहूब वठले आहेत. बघुयात तर मग कोण कोण कसे दिसत आहेत..

स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत अगदी तंतोतंत वाटतील असे काही अभिनेते आणि अभिनेत्री ह्या फोटोशूट मुळे आपल्यासमोर आले आहेत. वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या कॅरॅक्टर मध्ये आपल्याला दिसतो ललित प्रभाकर. आणि त्याचा फोटो पाहिलात तर तुम्ही त्याला ओळखणार सुद्धा नाही..

दुर्गा भाभी बनलीये उर्मिला कानेटकर. तिने सुद्धा खूप छान हावभाव चेहऱ्यावर दिलेत.

 

READ ALSO :  बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

कल्पना दत्त आहे श्रिया पिळगावकर तर कानाकलात बारूआ आहे सोनाली कुलकर्णी. दोघीनी साडीत आणि कृष्णधवल फोटो मध्ये अगदी चपखल पात्र पकडले आहे.

तर सौरभ गोखले विनायक दामोदर सावरकर म्हणून अगदी शोभून दिसतोय आणि अश्फाकउल्ला खान हा अक्षय टाकसाळे बनलेला दिसतो.

बिरसा मुंडे म्हणून प्रियदर्शन जाधव अगदी योग्य निवड ठरली आहे. स्वातंत्र्य लढ्यात हृद्य कविता करणारे सुब्रमण्य भरती बनलाय अमेय वाघ.

मंगल पांडेंच्या रुद्रावतारात शरद केळकर चमकतोय तर दामोदर हरी चाफेकर म्हणून आदिनाथ कोठारे ‘छा गया’ है..!

शांत सात्विक विवेकानंद हे उमेश कामत शिवाय कोणी असू शकत नाही. तो अगदी छान वाटतोय. तर चंद्रशेखर आझादांचा रुबाब आणि त्यांच्या वेशभूषेत प्रवीण तरडे हे एकदम भन्नाट जमून आलेलं आहे.

पुलंच्या रुपात पाहिलेला सागर देशमुख ह्या फोटो शूट मध्ये सुभाषचंद्र बोस म्हणून तितकाच प्रॉमिसिंग वाटला आहे.

सई ताम्हणकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून शोभलीये तर सुनील बर्वे ने टिळक साकारलेत. हे आणि अजून अनेक कलाकार वेगवेगळ्या रुपात तुम्हांला ह्या फोटोंमध्ये दिसतील. काही ओळखीचे तर काही अनोळखी पण ही काल्पनाच जगावेगळी आहे.

आता आपले संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारे अमोल कोल्हेच घ्याना.. बघा तरी ते कोणाच्या वेशात आहेत आणि कसे वाटतात.. असे खूप सरप्रायजेस अजून आहेत. आणि तुम्ही ते बघायलाच हवेत..

सगळे अभिनेते आणि अभिनेत्री ज्यांना आपण खूप वेगळी लाईफ स्टाईल जगताना पाहतो. पण हा ऐतिहासिक टर्न खूपच खास आहे. त्यातून सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाइट असल्याने आपल्याला त्या काळात घेऊन जातात. तेजस नेरुरकर ह्या फोटोग्राफरनी ‘कॅलेंडर वंदे मातरम २०१९’ ही स्वतःची कल्पना सुंदररित्या ह्या फोटोंद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. त्यांच्या या कल्पनेला सलाम..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...