बोगदा : आई मुलीच्या नात्याची गोष्ट

बोगदा : आई मुलीच्या नात्याची गोष्ट

नाते संबंधावर भाष्य करणारा चित्रपट नेहमी कलात्मक प्रकारात मोडतो. कलात्मक बाजू मांडताना कधी तर दोन तासांचा चित्रपट आयुष्यभराचे गमक सांगून जातो. तर कधी हे दोन तास देखील त्यासाठी अपुरे पडतात. एक असे नाते आहे ते तर जगात सर्वत्र खूप जपले जाते ते म्हणजे आई आणि मुलगी. खूप खोल, खूप गहिरे नाते, अति जवळीक, अति अगलीकता, एका नात्याचे अनेक कंगोरे, अनेक शक्यता त्यातीलच एक भाव म्हणजे ‘बोगदा ‘.

 

READ ALSO : परी हू में : एक भावनिक एका परीची परी होण्याची गोष्ट

बोगदा हा एका आई आणि मुलीच्या आयुष्याची गोष्ट आहे. इच्छामरणाची इच्छा असलेली आई आणि नृत्यांगना बनण्याची तिची इच्छा त्यात दोघींच्या वाटा. या वाटेवर जाताना कसे त्यांचे नाते फुलते त्यात आलेला तो बोगदा. एक सुंदर प्रवास, त्या प्रवासात हळुवारपणे उलगडत जाणारे त्यांचे नाते. हा चित्रपट एक कलात्मक आशयाचा चित्रपट आहे. कथा, संगीत , छायाचित्रण यांची व्यवस्थित सांगड या चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक पातळीवर बनवलेला नाही. त्यामुळे बोगदा स्वतःचे वेगळेपण जपतो . चित्रपट सुरुवातीपासून तर शेवट पर्यंत प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पडतो.

या चित्रपटाद्वारे निशिता केणी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे तसेच या चित्रपटाची कथा व पटकथा देखील त्यांनीच लिहिली आहे. एक नवोदित दिगादर्शिका असूनही चित्रपटाचा समतोल राखला गेला आहे. नाविन्य विषयातील योग्य पद्धतीने जपले आहे. चित्रपटाचा दर्जा टिकवून ठेवला आहे. यात चित्रपट बनवताना घेतलेली मेहनत दिसून येते. कलात्मक चित्रपट असला तरी कुठेही तो रटाळ वाना होत नाही. चित्रपटाच्या गरजेनुसार त्याची योग्यता जपून ठेवली आहे.

बोगदा हा कथा, दिग्दर्शन या प्रमाणेच अभिनय या बाबतही सरस आहे. सुहास जोशी यांनी आईच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे तर मुलीच्या भूमिकेतील मृण्मयी देशपांडे हिने हि त्याच ताकदीने तिची भूमिका साकारली आहे. रोहित कोकाटे याचाही अभिनय छान आहे.

फक्त आई आणि मुलगी हि मध्यवर्ती कथा असलेला बोगदा संपूर्ण चित्रपटात त्याने आशय सोडला नाही. त्यामुळे कथा भरकटली नाही, व रटाळ सुद्धा झाली नाही. अनेक कंगोरे असलेले आई आणि मुलीचे नाते या चित्रपटात अजून नवीन न उलगडलेला कंगोर आपल्याला पाहायला मिळतो. एकदा तरी बघावा असा ‘बोगदा ‘

फिमिभोंगा मराठी कडून ३ स्टार ५ पैकी

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author