बोगदा

आई आणि मुलीचे सुंदर नाते. आई हि मुलांसाठी सावली असते. ती सतत आपल्या मुलांसाठी झटत असते अगदी अथांग सागरासारखी कधीहि न थकाणारी आई, अशाच एका आईची व मुलीची गोष्ट आपल्यासमोर येणार आहे “बोगदा “ या चित्रपटाद्वारे. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.

मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे.

 

READ ALSO : अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण

तसेच या चित्रपटाद्वारे मृण्मयी देशपांडे पुन्हा मराठी चित्रपट क्षेत्रात पुनरागमन करत आहे. टीझर पाहता एक गोष्ट लक्ष्यात येते कि कमी शब्दात खूप काही मांडणायचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. कधी कधी शब्दापेक्षा भावनां खूप महत्वाच्या असतात. यातून असेही दिसून येते कि चित्रपटाच्या लिखाणावर खूप अप्रतिम प्रकारे काम करण्यात आले आहे. खर्या अर्थाने एका मुलीने आईसाठीचा केलेला प्रवास यातून दाखवण्यात आलेला आहे. आई सदैव आपल्या मुलांसाठी झटत असते परंतु आईसाठी आपण काय करतो किवा काय करावे ? या चित्रपटातून छान पद्धतीत मांडले आहे.

बोगदा हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून, या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान बोगदा सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनी केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी बोगदा या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे. निशिता केणी यांचा हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट नक्कीच आपल्याला एका वेगळ्या कल्पना विश्वात घेऊन जाणार याची खात्री आहे. माझ्यासाठी हा चित्रपट एक बौद्धिक पर्वणी असणार आहे आता हा कौल तुमचा आहे , तुम्हाला काय वाटते ते ?

येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला.

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षाची मुणगेकरची जमली जोडी 'कियारा' हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिलावर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील. कियारा उर्फ *प्रतीक्षा मुणगेकरचा* करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड...

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे  पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा – येस सर, मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात...

मोहन जोशी  दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत

मोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत ’६६ सदाशिव’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता...

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

नमुनेदार ‘बाबो’ ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना...

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

शीतल अहिरराव सांगतेय कहाणी थेंबाची… ‘H2O’

'H2O कहाणी थेंबाची'मधून शीतल अहिरराव करणार जनजागृती'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा', 'हंगामा', 'दिवाणा तुझा' या म्युझिक अल्बम्समधून शिवाय 'जलसा', 'मोल यांसारख्या चित्रपटांतून दिसणारा प्रॉमिसिंग चेहेरा म्हणजेच शीतल अहिरराव. मराठी चित्रपटसृष्टीत चमकू...

About The Author